राज्यात मार्चपासून कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही संख्या सातत्याने वाढत असल्याने राज्य सरकारने ब्रेक दि चेन अंतर्गत कडक निर्बंध लावले. याचा काही प्रमाणात फायदा होत असल्याचे गेल्या दोन दिवसांपासून येणा-या आकडेवारीवरुन दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील ११ जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने कामी होताना दिसत आहे. त्यामुळे ब्रेक दि चेनचे काटेकोरपणे पालन झाल्यास कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल, अशी चिन्ह दिसू लागली आहेत.
11 जिल्ह्यांमध्ये संख्या कमी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, मुंबई शहर व उपनगर, लातूर, औरंगाबाद, भंडारा, गोंदिया, नांदेड, धुळे आणि नंदुरबार या 11 जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असणा-या मुंबई आणि पुणे जिल्ह्यांत सुद्धा ही संख्या कमी होत असल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
या दोन जिल्ह्यांत वाढतेय संख्या
सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात 13 ते 19 एप्रिल दरम्यान असलेली कोरोना रुग्णांची संख्या, ही 8 हजार 958 इतकी होती. ती वाढून 27 एप्रिल ते 3 मे दरम्यान, 15 हजार 328 इतकी झाली आहे. तर सोलापूर जिल्ह्यात 13 ते 19 एप्रिल दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या 8 हजार 836 इतकी होती, ती 27 एप्रिल ते 3 मे दरम्यान 13 हजार 864 इतकी झाली आहे.
Maharashtra's Satara and Solapur districts show continued increase⬆️ in #COVID19 cases since last 2 weeks
– JS, @MoHFW_INDIA @Info_Solapur pic.twitter.com/e3cbIYOGkE
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) May 5, 2021
देशात 1 लाखापेक्षा अधिक सक्रीय रुग्ण असलेली एकूण 7 राज्ये आहेत. यात महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णांची संख्या ही देशात सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णसंख्या ही 6 लाख 44 हजार 68 इतकी आहे.
Join Our WhatsApp Community