Garbage : नव वर्ष स्वागताच्या जल्लोषात नागरिकांनी केला ११ मेट्रिक टन कचरा

205
Garbage : नव वर्ष स्वागताच्या जल्लोषात नागरिकांनी केला ११ मेट्रिक टन कचरा
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

नववर्ष स्वागतासाठी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येणारे नागरिक लक्षात घेता, मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रात्रीपासून ते बुधवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी पहाटेपर्यंत मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी हे देखील या स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. या मोहिमेद्वारे अवघ्या काही तासांत ११.४ मेट्रिक टन कचरा (Garbage) गोळा करत संबंधित परिसर स्वच्छ करण्यात आले.

New Project 2025 01 01T190550.647

दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील विविध चौपाटी, उद्याने, सार्वजनिक ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात. नववर्ष स्वागताच्या उत्‍साहात मोठ्या प्रमाणात जमलेल्या नागरिकांसाठी सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्‍यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत विविध उपाययोजना करण्यात आल्या.

New Project 2025 01 01T190912.422

(हेही वाचा – कोकणात जलमार्गांचे जाळे विस्तारणार – Nitesh Rane)

मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिनांक ३१ डिसेंबर २०२४ आणि १ जानेवारी २०२५ रोजी भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया), मरीन ड्राइव्ह, स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), माझगावमधील महाराणा प्रताप चौकआणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जंक्शन, कलानगर जंक्शन, वांद्रे स्थानक परिसर, जुहू चौपाटी, गोराई चौपाटी, बोरिवली बाजारपेठ, अक्सा चौपाटी, मार्वे चौपाटी तसेच मानखुर्द इत्यादी प्रमुख ठिकाणी व्यापक स्वच्छता मोहीम राबवली. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी हे देखील या स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. महानगरपालिकेचे अधिकारी, कामगार, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे कामगार असे सुमारे ५ हजार कामगार या मोहिमेत सहभागी झाले होते. लिटर पिकर, जेसीबी, डंपर, बीच क्लीनिंग संयंत्र, बॉबकॅट्स, ई-स्वीपर, मिस्टिंग मशीन, कॉम्‍पॅक्टर आदी ७० यंत्रसामग्रीचा वापर करत ११.४ मेट्रिक टन कचरा (Garbage) गोळा करण्‍यात आला. या मोहिमेमुळे उत्सवांच्या काळातही सार्वजनिक स्वच्छता राखण्याबाबत महानगरपालिकेची वचनबद्धता पुन्‍हा एकदा अधोरेखित झाली आहे.

New Project 2025 01 01T190729.727

दरम्‍यान, मुंबई पोलिसांच्या सुचनांनुसार, मरीन ड्राइव्ह ते भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) येथे आवश्यक त्याठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था तसेच दुभाजकांच्या ठिकाणी महानगरपालिकेच्‍यावतीने रस्‍तारोधक (बॅरिकेडिंग) करण्यात आले. मरीन ड्राइव्ह येथे ७ आणि भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) येथे ४ निरीक्षण मनोरे (वॉच टॉवर) उभारण्यात आले. तसेच, या परिसरात रात्रीपाळीमध्ये मिस्ट व्हेईकल आणि लिटर पिकर या वाहनांसोबतच जेसीबी, डंपर्सचीही व्यवस्था करण्यात आली होती. एकंदरीत, या सर्व उपाययोजनांच्‍या अंमलबजावणीमुळे अवघ्‍या काही तासात सर्व संबंधित परिसर स्‍वच्‍छ होऊन पूर्ववत झाल्‍याचा सुखद अनुभव नागरिकांना आला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.