अखेर त्या चिमुरडीला मिळाली 16 कोटींची लस

सर्व जनतेने आशीर्वाद दिले या सगळ्यांच्या कष्टाचे आज फळ मिळाले आणि वेदिकला लस मिळाली, अशा भावना वेदिका च्या पालकांनी व्यक्त केल्या.

108

बुधवारी सकाळी ११ वाजता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे वेदिका सौरभ शिंदे या SMA TYPE 1 हा दुर्मिळ आजार झालेल्या, ११ महिन्यांच्या चिमुरडीला zolgensma ही लस अमेरिकेतून आयात करुन देण्यात आली. वेदिकाला २ दिवसांपूर्वी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर सर्व गरजेच्या चाचण्या करुन त्यानंतर तिला लस देण्यात आली. आता तिची प्रकृती चांगली आहे. ही वन टाईम जिनथेरेपी असल्याने सिंगल डोस इंजेक्शन दिलं जाणार आहे.

केंद्राने केले आयात शुल्क माफ

या लसीवरील आयात शुल्क माफ करण्यासाठी वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य भवन विभागाशी व केंद्रीय वित्त मंत्रालया बरोबर पत्रव्यववहार केला होता. याची दखल घेऊन केंद्र सरकारने आयात शुल्क व कर माफ केले आहेत. यासाठी सिने-अभिनेते निलेश दिवेकर अणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे सचिव संकेत भोंडवे यांचे योगदान मोलाचे होते, अशी माहिती वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी दिली.

सर्वांच्या कष्टाचे फळ

वेदिका अवघी ८ महिन्यांची असताना तिला SMA TYPE 1 हा दुर्मिळ आजार झाला असल्याचे निदर्शनास आले. या आजारावर zolgensma ही लस देणे गरजेचे होते. त्याप्रमाणे एका सामान्य कुटुंबातील वेदिकाचे वडील सौरभ आणि स्नेहा शिंदे यांनी जीवाचे रान करुन तब्बल १६ कोटी रुपये लोकनिधी व सीएसआर मार्फत जमा केले आणि आज त्या सर्व मेहनतीचे चीज झाले. सर्व दात्यांनी आपाआपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत केली. सर्व जनतेने आशीर्वाद दिले या सगळ्यांच्या कष्टाचे आज फळ मिळाले आणि वेदिकला लस मिळाली, अशा भावना वेदिका च्या पालकांनी व्यक्त केल्या.

WhatsApp Image 2021 06 16 at 7.19.30 PM

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विशेष प्रयत्न करुन शक्य तितकी मदत केली. संसदेत अशा आजारांसाठी विशेष तरतूद करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील यांनी सुरवातीपासून लस मिळेपर्यंत शिंदे कुटुंबासोबत उभे राहून लागेल ती मदत केली, असे देखील शिंदे कुटुंबीयांनी आवर्जून सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.