यासीन भटकळसह ११ दहशतवादी सुरतवर करणार होते अणुबॉम्ब हल्ला

83

इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा यासीन भटकळ आणि त्याच्या ११ दहशतवाद्यांनी वर्ष २०१२ मध्ये गुजरातमधील सुरत शहरावर अणुबॉम्ब हल्ला करण्याचे कारस्थान रचले होते. तसे पुरावे तपास यंत्रणांनी न्यायालयात सादर केले.

दिल्लीच्या पटियाला हाउस न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सांगितले की, आरोपींच्या विरूद्ध देशद्रोहाच्या कलमानुसार खटला चालवण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध आहेत. यासीन भटकळ आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत झालेले संभाषण समोर आले आहे. ज्यामध्ये ते सर्व जण सूरतवर अणुहल्ला करणार होते. या हल्ल्यापूर्वी त्या ठिकाणच्या मुस्लिमांना तिथून नियोजनपूर्वक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार होते, असे तपास यंत्रणांच्या तपासात समोर आले.

(हेही वाचा मोदींच्या पदवीवरून उद्धव ठाकरेंची टीका, अजित पवार म्हणतात विषय महत्वाचा नाही)

भारतातील शांतता आणि सामाजिक स्थिरता भंग करण्यासाठी हे दहशतवादी नवीन मुस्लिम तरुणांची भरती करत असतात. यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांना भारतातील स्लीपर सेलचे संपूर्ण सहकार्य असते. भारतातील विभिन्न भागात, मुख्यत्वे राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याचा त्यांचा उद्देश होता. यासंबंधी सध्या तपास करत असलेली सरकारी संस्था, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार इंडियन मुजाहिदीन आणि या संबंधित असलेल्या इतर संस्था अशा स्वरूपाची दहशतवादी कारवाई करण्यासाठी परदेशातून पैसे मिळवतात. या संघटना बाबरी मस्जिद, गुजरातमध्ये झालेले दंगे यासारख्या घटनांचे दाखले देऊन मुसलमान तरुणांना भडकवण्याचे काम करतात.

या दहशतवाद्यांविरोधात आरोप दाखल 

या प्रकरणात यासिन भटकल, मोहम्मद दानिश अंसारी, मोहम्मद आफताब आलम, इमरान खान, सैयद, ओबैद योर रहमान, असदुल्ला अख्तर, उजैर अहमद, मोहम्मद तहसीन अख्तर, हैदर अली, जिया योर रहमान यांच्या विरोधात आरोप दाखल करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.