राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २८ जिल्हे व ३०९ गावे प्रभावित झाली असून, ११० नागरिकांनी जीव गमावला आहे. ४४ घरांचे पूर्णत:, तर २ हजार ८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. पूरबाधितांची गैरसोय टाळण्यासाठी ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. तसेच १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्रात Voter Id होणार Aadhaar शी लिंक; ‘या’ दिवसापासून सुरू होणार प्रक्रिया)
१४ तुकड्या तैनात
राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून, पूरपरिस्थितीवर उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत २, पालघर १, रायगड २, ठाणे-२, रत्नागिरी २, कोल्हापूर २, सातारा १ अशा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) १२ तुकड्या, तर नांदेड आणि गडचिरोली येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community