अतिवृष्टीमुळे राज्यात आतापर्यंत ११० जणांनी गमावला जीव

राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २८ जिल्हे व ३०९ गावे प्रभावित झाली असून, ११० नागरिकांनी जीव गमावला आहे. ४४ घरांचे पूर्णत:, तर २ हजार ८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. पूरबाधितांची गैरसोय टाळण्यासाठी ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. तसेच १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्रात Voter Id होणार Aadhaar शी लिंक; ‘या’ दिवसापासून सुरू होणार प्रक्रिया)

१४ तुकड्या तैनात

राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून, पूरपरिस्थ‍ितीवर उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत २, पालघर १, रायगड २, ठाणे-२, रत्नागिरी २, कोल्हापूर २, सातारा १ अशा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) १२ तुकड्या, तर नांदेड आणि गडचिरोली येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here