Gujarat : दूषित पाण्यामुळे 110 जण रुग्णालयात

43
Gujarat : दूषित पाण्यामुळे 110 जण रुग्णालयात
Gujarat : दूषित पाण्यामुळे 110 जण रुग्णालयात

गुजरातच्या सुरतमध्ये दूषित पाणी पिल्याने 110 कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुजरातमधील (Gujarat) सुरत येथील एका डायमंड युनिटमध्ये (Diamond Unit) दूषित पाणी प्यायल्याचा संशय आल्यानंतर 110 कामगारांना रुग्णालयात दाखल करावे लागले. कामगारांनी परिसरात बसवलेल्या कूलरमधील पाणी प्यायले होते, ज्यामध्ये कीटकनाशके असल्याचा संशय होता. याबाबत पोलिस उपायुक्त (DCP) आलोक कुमार (Alok Kumar) म्हणाले की, कपोदरा परिसरातील मिलेनियम कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या अन्भव जेम्सच्या कामगारांना खबरदारीचा उपाय म्हणून युनिट मालकाने वैद्यकीय तपासणीसाठी 2 वेगवेगळ्या रुग्णालयात नेले. कोणत्याही कामगारांना विषबाधेशी संबंधित कोणताही आजार नाही परंतु त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

(हेही वाचा – Mumbai मध्ये पायाभूत सुविधा, परिवहन व्यवस्था, वीज, पाणी सर्वत्र वाढला ताण; जनहित याचिकेतून उपस्थित झाले सवाल)

कुमार (Alok Kumar) म्हणाले की, कूलरच्या पाण्यात कीटकनाशकांनी भरलेली फाटलेली प्लास्टिकची पिशवी आढळली. तथापि, ज्या कागदी पिशवीत प्लास्टिकची पिशवी ठेवली होती ती शाबूत होती. ती कागदी पिशवी असल्याने, काही प्रमाणात कीटकनाशक पाण्यात शिरले असावे अशी भीती होती, याप्रकरणी तपासाच्या आधारे गुन्हा दाखल केला जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल, असे डीसीपी अलोक कुमार (Alok Kumar) यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.