हिमाचल प्रदेशातील पर्वतांमध्ये वाढती बांधकामे आणि कमी होत जाणारे वनक्षेत्र यामुळे हिमालयाचे वय कमी होत आहे. त्यामुळे डोंगराला भेगा पडत आहेत. दोन वर्षांत येथे दरड कोसळण्याच्या घटना सहा पटीने वाढल्या आहेत. या पावसाळ्याच्या ५५ दिवसांत ११३ वेळा भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. पाऊस आणि भूस्खलनाच्या Himachal land slide घटनांमध्ये गुरुवार पर्यंत ३३० जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला आहे.
हिमाचल प्रदेशातील महामार्ग अनेक ठिकाणी बंद झाले आहेत. हजारो कोटींची जीवित-वित्तहानी झाली आहे.रस्त्यांसाठी हिमाचलचे पर्वत सरळ कापले जात आहेत. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेले खडकही कापले जात असल्याने पाण्याचा निचराही व्यवस्थित होत नाही. परिणामी हिमाचलमधील उतार असलेल्या भागांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. बोगदा आणि हायड्रो प्रकल्पातील स्फोटामुळे दरडी कोसळण्याच्या घटनाही वाढत आहेत. यामुळे पर्वत ७४२ मिमी पाऊसही सहन करू शकत नाहीत. ज्या ठिकाणी डोंगर कापले नाहीत तिथेही जमीन खचण्याच्या घटना घडत आहेत. शिमल्यातील अनेक सरकारी इमारतींना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. १५० कुटुंबांना आतापर्यंत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
(हेही वाचा : Indian Flag Insult In Tiranga : स्वातंत्र्यदिनी तिरंग्याचा घोर अपमान, मदरशात तिरंगा अंथरून त्यावरच दिला नाश्ता)
२१ ऑगस्टपासून मुसळधार पावसाची शक्यता
वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता बळावली आहे. बदलत्या हवामानामुळे यंदा राज्यात मान्सून जास्त काळ टिकू शकतो, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. त्याचबरोबर शिमला, सोलन, कुल्लू, बिलासपूरसह राज्याच्या इतर भागातही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community