अकरावी प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका वेबसाइटवर उपलब्ध

101

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या फॉर्मचा भाग-१ भरण्यास सुरूवात झालेली असून याची माहिती पुस्तिका उपलब्ध नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ होत होता. यामुळे पालकांकडून माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्याबाबत विचारणा होत होती. यामुळेच २४ जून रोजी http://11thadmission.org.in आणि dydemumbai.com या दोन्ही वेबसाइटवर माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

( हेही वाचा : ट्रेनच्या तिकिटांवर असणाऱ्या RAC, RSWL, CNF या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?)

अकरावी प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तिका

सर्व उच्च माध्यमिक शाळा किंना ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. म्हणूनच प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आवश्यक असलेली माहितीपुस्तिका शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून आता वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे.

स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष आणि हेल्पलाइन क्रमांक

तसेच विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष आणि हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. विभागीय उपसंचालक कार्यालय, चर्नी रोड (पश्चिम ) येथे मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच 9823009841 आणि 9969711422 हे भ्रमणध्वनी क्रमांत उपलब्ध केले आहेत. त्याचप्रमाणे mumbai.11thadmission@gmail या ई-मेलवर संपर्क करावा असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.