11वी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा, असे घेता येणार ऑनलाईन Admission

शुक्रवारी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वीच्या प्रवेशांचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालामुळेच 11 वी प्रवेशाची प्रक्रिया रखडली होती. येत्या सोमवारपर्यंत ऑनलाईन 11वी प्रवेश फे-यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे.

एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होऊन एक महिना झाल्यावर सुद्धा अजूनपर्यंत 11 वीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नव्हती. सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षांचे निकाल लागल्यानंतर आता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

अर्ज भरता येणार 

कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंती नोंदवता येणार आहे. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 22 जुलै 2022 पासून अर्जाचा भाग दोन म्हणजेच पसंतीची 10 महाविद्यालये प्राधान्यक्रमाने नोंदवता येणार आहे. नियमित फेरी 1 साठी महाविद्यालय अलॉटमेंट आणि प्रवेश कार्यवाही याबाबत सोमवारपर्यंत वेळापत्रक दिले जाणार असून, नवीन विद्यार्थ्यांना भाग 1 आणि 2 यासाठी 4 ते पाच दिवसांचा अवधी मिळणार आहे. त्यानंतरच प्रवेश फेरी सुरू होईल.

ग्रामीण भागात असा भरा अर्ज

शिक्षण संचालनालयाने राज्यातील ज्या क्षेत्रात अकरावीचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने होतात तिथे ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर),पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रांतील ऑनलाईन पद्धतीने प्रवेश होत असतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची भाग 1चा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु राहिलच, सोबत अर्जाचा भाग 2 भरण्याची प्रक्रीया ही सुरू करता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here