अकरावीची संपूर्ण प्रवेशप्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर…

136

अखेर सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील रखडलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु झाली आहे. 25 जुलैपासून पहिल्या प्रवेश फेरीला सुरुवात होत आहे, तर 3 ऑगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळ ही अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडली होती.

राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता १०वीचा निकाल १७ जुलै रोजी जाहीर झाला. मात्र महिना होऊन सुद्धा इतर बोर्डाच्या दहावीच्या निकालासाठी ११ वी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे आता इतर बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशाची पहिली फेरी सुरू होत आहे. २५ जुलैपासून अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी प्रक्रिया सुरु होणार आहे. तर ३ ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

कसे असेल ऑनलाईन अकरावी प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक?

  • २५ जुलै सकाळी १० पासून ते २७ जुलै रात्री १० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयाचे पसंती क्रमांक नोंदवयाचा आहे. म्हणजेच नियमित प्रवेश फेरी एक साठी पसंती अर्ज भाग-2 ऑनलाईन सादर करायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना १ ते १० कॉलेजचा पसंतीक्रम देता येईल. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्धाचा भाग १ लॉक करायचा आहे. विद्यार्थ्यांच्या डेटा प्रोसेसिंग नंतर गुणवत्तेनुसार आणि दिलेल्या पसंतीनुसार कॉलेज पहिल्या फेरीमध्ये मिळतील.
  • जे नवीन विद्यार्थी या ऑनलाईन ११वी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत त्यांना अर्जाचा भाग एक आणि भाग १ भरता येईल. २८ जुलै सकाळी १० पासून ते ३० जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
  • सर्वसाधारण गुणवत्ता यादीत दुरुस्ती असल्यास तर ऑनलाईन हरकती विद्यार्थ्यांनी सादर कराव्यात. या सगळ्या दुरुस्त झाल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम केली जाणार आहे.

(हेही वाचा शरद पवारांची कोलांटउडी! आधी बाबासाहेब पुरंदरेंचे कौतुक नंतर टीका)

  • ३ ऑगस्ट सकाळी १० वाजता प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. यामध्ये पहिल्या फेरीचे कट ऑफ पोर्टलवर दर्शविले जातील.
  • ३ ऑगस्ट सकाळी १० ते ६ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करता येईल. मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असल्यास प्रवेशाची औपचारिकता या काळात विद्यार्थ्यांनी पूर्ण करावी आणि  आपला प्रवेश निश्चित करावा.
  • जर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी प्रोसीड फॉर अॅडमिशनवर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा.
  • जर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा नसेल तर तो विद्यार्थी पुढील फेरीसाठी थांबू शकतो. मात्र पसंती क्रमांक एक नंबरला असलेले कॉलेज विद्यार्थ्याला पहिल्या फेरीत मिळाले असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रवेश घेणे अनिवार्य असेल अन्यथा त्याला एक प्रवेश फेरी प्रतिबंधित केली जाईल.
  • जर एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश निश्चित करून त्यानंतर रद्द करायचा असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल.
  • ७ ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जारी केल्या जातील व त्यानंतर दुसरी फेरी आयोजित केली जाईल.

संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल

  • ७ ते १७ ऑगस्ट – नियमित दुसरी फेरी
  • १८ ते २५ ऑगस्ट – नियमित तिसरी प्रवेश फेरी
  • २६ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर – नियमित प्रवेशाची विशेष फेरी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.