राज्यात कोरोनाचे 12 बळी

राज्यात 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला. मुंबई, ठाणे, कल्याण – डोंबिवली, रायगड, पुणे, अकोला, सातारा, वर्धा येथे मिळून 12 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

( हेही वाचा : राज्यात प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी )

राज्यात रुग्ण बरे होण्याचा 97.98 टक्कयांचा दर तसाच कायम आहे. या टक्क्यात मंगळवारी वाढ दिसून आली नाही. मंगळवारी नव्या रुग्णनोंदीत 2 हजार 135 कोरोना रुग्णांची भर पडली तर 2 हजार 656 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आता 14 हजार 92 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार दिले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

हजारीपार रुग्णसंख्या असलेले जिल्हे

  • पुणे – 4 हजार 798
  • नागपूर – 1 हजार 545
  • मुंबई – 1 हजार 805

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here