इंदूर येथील बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता. त्यावेळी या मंदिरात असलेल्या पुरातन विहिरीचे छत कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत २५ ते ३० जण या विहिरीत पडले. त्यानंतर या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. मदत आणि बचावकार्य करणाऱ्या पथकाने १२ मृतदेह बाहेर काढले, इतर १९ जणांवर उपचार सुरू आहेत. १२ मृतांमध्ये १० महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या ठिकाणी भेट दिली. ज्या मंदिरात ही दुर्घटना घडली तिथे मदत आणि बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले होते. ही घटना नेमकी कशी घडली त्याची चौकशी करण्याचे आदेशही आम्ही दिले आहेत, असे गृहमंत्री मिश्रा म्हणाले. इंदूरच्या बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता. त्यावेळी अचानक विहिरीचे छत कोसळले. २५ ते ३० भाविक या विहिरीत कोसळले. इंदूरमधल्या स्नेहनगरमध्ये पटेलनगर हा भाग आहे. या ठिकाणी बेलेश्वर मंदिर आहे. या मंदिरात विहिर आहे. खूप आधीपासून ही विहिर आहे. भाविक रामनवमीच्या उत्सवासाठी या ठिकाणी जमले होते. जो विहिरीचा भाग होता त्यावर मंदिर होते. विहिरीचे छत कोसळल्याने सर्व भाविक विहिरीत पडले.
(हेही वाचा राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यावर प्रथमच बोलले अमित शाह, म्हणाले…)
Join Our WhatsApp Community