सुट्टीच्या दिवशी अनेक जण फिरण्यासाठी घराबाहेर पडतात, येत्या रविवारी सुद्धा मुंबईत मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. रविवार १० एप्रिलला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : इंधन भडकले! वाहनचालक शेजारील राज्यात धावत सुटले… )
१२ तासांचा मेगाब्लॉक
- दिवा – कल्याण धीम्या मार्गावर सकाळी ९.०० ते रात्री ९.०० पर्यंत मेगाब्लॉक ( megablock)
- ठाणे ते कल्याण धीम्या मार्गावर दुपारी १२.१० ते सायंकाळी ५.१० पर्यंत मेगाब्लॉक
- ठाणे येथून सकाळी ८.३७ ते ११.४० आणि दुपारी ४.४१ ते रात्री ८.५९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या व अर्ध जलद (Semi fast)रेल्वे गाड्या दिवा आणि कल्याण स्थानकांदरम्यान मार्गावर वळवण्यात येतील. या ट्रेन कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.
- मुलुंड येथून सकाळी ११.५४ ते सायंकाळी ४.१३ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या व अर्ध जलद गाड्या मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील या लोकल ट्रेन कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात थांबणार नाहीत आणि निर्धारित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
- ठाणे येथून सकाळी ९.०६ ते रात्री ८.३१ या वेळेत सुटणाऱ्या जलद लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा येथे थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिरा पोहोचतील.
- कल्याण येथून सकाळी ८.५१ ते ११.१५ आणि सायंकाळी ६.५१ ते ८.५५ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या लोकल कल्याण आणि दिवा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील तसेच ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत.
- याशिवाय कल्याण येथून सकाळी ११.२५ ते दुपारी ३.५१ पर्यंत धीम्या व अर्ध जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल ट्रेन ठाकुर्ली आणि कोपर स्थानकात थांबणार नाहीत आणि निर्धारित वेळेच्या १० -१५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
- कल्याण येथून सकाळी ८.४६ ते रात्री ८.३५ या वेळेत सुटणाऱ्या जलद लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा येथे थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
प्रशासनाने व्यक्त केली दिलगिरी
हा मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. या विशेष मेगाब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करत प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community