पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने गुरुवार १२ जानेवारीपासून पंधरा डब्यांच्या आणखी १२ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील ६ फेऱ्या या जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
( हेही वाचा : ५५ प्रवाशांना न घेताच विमानाने घेतले टेक-ऑफ! DGCA ने कंपनीला बजावली नोटीस )
पंधरा डबा लोकलच्या आणखी १२ फेऱ्या
पश्चिम रेल्वेवर येत्या १२ जानेवारीपासून पंधरा डब्यांच्या आणखी १२ फेऱ्या वाढणार आहेत. यामुळे प्रत्येक लोकलमागे प्रवासी वाहण्याच्या क्षमतेत २५ टक्के वाढ होणार आहे. यामुळे प्रवाशांना गर्दीमधून काही दिलासा मिळणार आहे असे पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात जारी केले आहे. पश्चिम रेल्वेवरील १५ डब्यांच्या एकूण फेऱ्यांची संख्या १३२ वरून १४४ होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकातील १२ डब्यांच्या लोकलचे पंधरा डब्यात रुपांतर केल्याने पश्चिम रेल्वेच्या एकूण फेऱ्यांची संख्या १३८३ एवढीच राहणार आहे. तर एसी लोकलच्या एकूण ७९ फेऱ्या होणार आहेत.
१५ जानेवारीला मुंबईत होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वे सकाळी विरार ते चर्चगेट तसेच चर्चगेट ते वांद्रे या दरम्यान २ अतिरिक्त धीम्या गाड्या चालवण्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community