Padma Award Maharashtra : यंदा महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

Padma Award Maharashtra : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला १२ पुरस्कार मिळाले आहेत. दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार प्यारेलाल यांच्यासह सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार, तर सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, नेत्रतज्ञ मनोहर डोळे यांच्यासह सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.

240
Padma Award Maharashtra : यंदा महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव
Padma Award Maharashtra : यंदा महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा २५ जानेवारीच्या रात्री उशिरा करण्यात आली. पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला १२ पुरस्कार मिळाले आहेत. (Padma Award Maharashtra) महाराष्ट्रातील पुरस्कारांमध्ये प्रसिद्ध साहित्यिक होर्मुसजी कामा यांना (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता) क्षेत्रात, अश्विन मेहता यांना (वैधक), ज्येष्ठ नेते राम नाईक यांना (सार्वजनिक सेवा), दिग्दर्शक राजदत्त आणि प्यारेलाल शर्मा यांना (कला) तर कुंदन व्यास यांना (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता) क्षेत्रात पद्मभूषण (Padma Bhushan), तर महाराष्ट्रातील अन्य सहा मान्यवरांना पद्मश्री (Padmashri) पुरस्कार जाहीर झाले आहेत.

(हेही वाचा – Secular Constitution : निधर्मी, अल्पसंख्यांकवादी ‘सेक्युलर’ संविधान!)

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. पद्म पुरस्कार (Padma Award) हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखले जातात. गृह मंत्रालयाकडून या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते.

पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमधे महाराष्ट्रातील ६ मान्यवर

सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू (Rajdutt Mayalu), ज्येष्ठ नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक (Ram Naik), संगीतकार प्यारेलाल (Pyarelal), हृदयरोगतज्ञ अश्विन मेहता (Ashwin Mehta), जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक कुंदन व्यास, ज्येष्ठ पत्रकार होर्मुसजी एन कामा यांचा समावेश आहे.

पद्मश्री पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील ६ मान्यवर

बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलिकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पापळकर यांनी अनेक बालकांच्या जीवनाला आधार देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे.

क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आणि अनेक मल्लखांबपटू घडवण्यासाठी उदय देशपांडे यांनी अथक परिश्रम घेत मोठे योगदान दिले आहे.

वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. मनोहर कृष्णा डोळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. मनोहर डोळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. नेत्रतपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे.

(हेही वाचा – 75 th Republic Day : गणतंत्र ते हिंदूतंत्र)

साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी झहीर काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदू रोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री (Padmashri) पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

व्यवसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कल्पना यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर देखील त्यांनी काम केले आहे. (Padma Award Maharashtra)

या वर्षी एकूण 132 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 5 पद्म विभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.