RTO च्या नव्या सुविधा; आता घरबसल्या घेता येणार 14 सुविधांचा लाभ

178

आधार क्रमांकाचा वापर करुन ‘फेसलेस’ पद्धतीने RTO च्या 12 सेवा दिल्या जात होत्या. आता आणखी दोन सेवांची भर पडली आहे. आता घरी बसूनच वाहन हस्तांतरण आणि तात्पुरती नोंदणीही करता येईल. केंद्र सरकारने आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर आधारकार्ड नंबर टाकून माहिती व शुल्क भरुन आरटीओच्या 14 ‘फेसलेस’ सेवांचा लाभ घेता येणार आहे.

काय सुविधा?

लर्निंग लायसन्स, परीक्षा, डुप्लिकेट आरसी, डुप्लिकेट लायसन्स, लायसन्स नूतनीकरण, एनओसी, आरसी किंवा लायसन्सवरील पत्ता बदल, कंडक्टर लायसन्सचे नूतनीकरण, वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहन हस्तांतरण, परमिट हस्तांतरण, विशेष परमिटसाठी अर्ज, परिवहन सेवेतील रेकाॅर्डमध्ये मोबाईलचा नंबर नोंदवणे, कर्जबोजा रद्द करण्यासह आता वाहन ट्रान्सफर व तात्पुरती नोंदणी सेवेचा समावेश.

( हेही वाचा: मोदी सरकार नारी शक्ती अंतर्गत महिलांना २.२० लाख मिळणार? जाणून घ्या फॅक्ट… )

‘असा’ करा अर्ज

  • वाहन विकणा-यांनी व वाहन विकत घेणा-यांनी परिवहन डाॅट जीओव्ही डाॅट इन या संकेतस्थळावरुन वाहन हस्तांतरणाकरता आधार क्रमांकाचा वापर करुन अर्ज करावा.
  • वाहन व चेसीस क्रमांकाचे छायाचित्र ओळखपत्रासह अपलोड करावे.
  • अर्ज पूर्ण केल्यानंतर नमुना 29 ची एक प्रत मूळ नोंदणी प्राधिकरणास ई-मेलद्वारे प्राप्त होईल.
  • अर्जदारास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. प्राप्त अर्ज छाननी करुन दोन दिवसांच्या आत निकाली निघेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.