राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आर्थिक धोरणांना (american tariffs) अमेरिकेत मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. विविध राज्यांत हजारो निदर्शक रस्त्यांवर उतरले आहेत. ‘हँड्स ऑफ’ (Hands Off Protests) आंदोलनातून देशभर १२०० ठिकाणी शनिवार, ५ एप्रिल या दिवशी भव्य मोर्चे काढण्यात आले. ५० राज्यांत हा असंतोष असून, या मोर्चात १५० हून अधिक संघटना उतरल्या आहेत. या आंदोलनात सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, लोकशाही संस्थांचे रक्षण, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येत केली जात असलेली कपात व विदेशी नागरिकांची हकालपट्टी या धोरणात ट्रम्प यांनी हुकूमशाही चालवल्याचा आरोप आहे.
(हेही वाचा – Primary Education महागले; शाळांच्या शुल्कात तीन वर्षांत ५०-८० टक्क्यांची वाढ)
अमेरिकेतील मिडटाऊनपासून अगदी अलास्कापर्यंत सर्वच शहरांत नागरिकांचा हा असंतोष दिसून आला. हजारो निदर्शक रस्त्यावर उतरून हाती निषेधाचे फलक घेत विरोध करताना दिसले. या नागरिकांचा मुख्य रोष ट्रम्प व मस्क यांच्या विरोधात होता. आरोग्यविषयक निधीमध्ये कपात केल्याचा आरोप या नागरिकांनी ट्रम्प प्रशासनावर केला आहे.
‘हँड्स ऑफ’ या आंदोलनात बॉस्टन, शिकागो, लॉस एंजल्स, न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीसह इतर शहरांमध्ये मोठ्या संख्येने लोकांची गर्दी पहायला मिळाली. ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणातील बदलांचा निषेध करत त्यांनी, हँड्स ऑफ कॅनडा, हँड्स ऑफ ग्रीनलँड, हँड्स ऑफ युक्रेन अशा घोषणा दिल्या. ‘डिअर रिपब्लिकन्स डू युवर जॉब’, ‘इम्पॅच ट्रम्प’ अशा आशयाचे फलक हाती घेत निदर्शने करण्यात आली.
ट्रम्प यांनी प्रशासकीय क्षमतावृद्धीसाठी स्थापन केलेल्या ‘डोज’चे प्रमुख म्हणून इलॉन मस्क (elon musk) यांची नेमणूक केली. या माध्यमातून कर्मचारी कपात, अनेक नागरिकांची देशातून हकालपट्टी आणि इतर वादग्रस्त निर्णय घेतले जात आहेत. ज्या स्रोतांवर हक्कच नाही, अशा क्षेत्रावर सरकारकडून ताबा मिळवला जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
अमेरिकेतील १५०हून अधिक संघटना सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या असून, यात सिव्हिल राइटस् ऑर्गनायझेशन, लेबर युनियन व अनेक दिग्गजांचा समावेश आहे. हे आंदोलन २०१७ मधील महिला मोर्चा आणि २०२० मधील ब्लॅक लाईव्हज् मॅटर विरोधातील निदर्शनासारखे मानले जाते. ट्रम्प यांनी आपल्या धोरणांत बदल केले नाहीत, तर हा विरोध अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. (Hands Off Protests)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community