पाकिस्तानातील परिस्थिती भयावह; १२०० लोकांनी गमावला जीव

147

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात मृत झालेल्या नागरिकांचा आकडा आता १२०० च्या पुढे गेला आहे. पाकिस्तानमधील परिस्थिती अतिशय बिकट झाली असून नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १२०८ नागरिकांनी आपला जीव गमावला असून यात ४१६ मुले आणि २४४ महिलांचा समावेश आहे. तसेच पुरामुळे तब्बल ६ हजार ९२ लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : गणेश विसर्जनाच्या दिवशी पश्चिम रेल्वेवर धावणार ८ अतिरिक्त लोकल)

सिंध आणि बलुचिस्तानला सर्वाधिक फटका

पाकिस्तान सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाचे १० अब्ज डॉलर नुकसान झाले आहे. पाकिस्तानमधील अतिवृष्टीमुळे ३.३ दशलक्ष लोकांना याचा फटका बसला आहे. त्याचबरोबर १० लाखांहून अधिक नुकसानही झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये ऑगस्ट महिन्यात १६६.८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदा येथील पावसात २४१ टक्के वाढ झाली आहे. तीन दशकातील सर्वाधिक पाऊस पडल्याने आणि हिमनद्या वितळल्याने देशाचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला आहे. याचा सिंध आणि बलुचिस्तानला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.