जागतिक पर्यावरण दिनी मुंबईत १२०० झाडांची लागवड!

मुंबई महानगरपालिकेद्वारे शनिवारी एकूण ८३ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या अंतर्गत शहर भागात १८, पूर्व उपनगरांमध्ये २९ आणि पश्चिम उपनगरांमध्ये ३६ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण दिवसभरात मुंबईत एकूण ८३ ठिकाणी १ हजार २०० पेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमांना मान्यवर नगरसेवक, मान्यवर नगरसेविका, मान्यवर लोकप्रतिनिधी यांच्यासह वलयांकित व्यक्तीमत्त्वांनी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

दरवर्षी पर्यावरण दिनी वृक्षारोपण!

सन १९७४ पासून जगभरात दरवर्षी ५ जून रोजी पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या परिसरातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सदैव कटिबद्ध असणारी आणि त्यादृष्टीने अव्याहतपणे कार्यरत असणारी आपली मुंबई महानगरपालिकादेखील दरवर्षी पर्यावरण दिनी वृक्षारोपण करीत असते व पावसाळ्यातील वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ देखील करीत असते. याच अनुषंगाने मुंबईतील परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

(हेही वाचा : दुसऱ्या लाटेत उसंती मिळताच कोविड सेंटरची डागडुजी सुरु!)

मुंबईमध्ये स्थानिक प्रजातींची तब्बल २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प!

मुंबई महानगरपालिकेद्वारे शनिवारी एकूण ८३ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या अंतर्गत शहर भागात १८, पूर्व उपनगरांमध्ये २९ आणि पश्चिम उपनगरांमध्ये ३६ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पश्चिम उपनगरातील जुहू परिसरात असणाऱ्या एन.एस. मार्ग क्रमांक ७ च्या लगत सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांमध्ये प्रामुख्याने सोनचाफा, सीता, अशोक, तामण, बकुळ, कांचन, बहावा, पुत्रंजीवा, जांभूळ, कडूनिंब, आंबा, नारळ, करंज, वड, पिंपळ यासारख्या स्थानिक प्रजातींच्या झाडांच्या रोपटे यांचा समावेश होता, अशीही माहिती उद्यान विभागाद्वारे देण्यात आली आहे. पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या शृंखलेत मुख्य कार्यक्रम हा शनिवारी सकाळी वरळी परिसरातील लाला लजपतराय मार्गालगत आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी १ हजार झाडांचे ‘मियावाकी वन’ फुलविण्यात येणार असून महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन या वनाचा व यंदाच्या मोसमातील वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमध्ये स्थानिक प्रजातींची तब्बल २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प महापालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे.

एकूण ४,८०० रोपट्यांचे वाटप!

त्याचबरोबर आजच्या ४८ व्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य लक्षात घेऊन मुंबईत विविध ठिकाणी एकूण ४,८०० रोपट्यांचे वाटप देखील करण्यात आले, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here