आरटीई (RTE) प्रवेशाची चौथी फेरी सुरू झाली असताना आजवर लॉटरीमध्ये नशिबवान ठरलेल्या ३ हजार २३० बालकांपैकी १ हजार २१२ बालकांच्या पालकांनी प्रवेशाला पाठ दाखविली आहे. तसेच कागदोपत्रांअभावी ४२ प्रवेश रद्द करण्यात आले आहे. तर ४२० रिक्त असलेल्या जागांसाठी २७ सप्टेंबरपर्यंत प्रवेश स्वीकारले जात आहे. त्यामुळे यापूर्वी प्रवेशाला पाठ दाखविणाऱ्या १ हजार २१२ बालकांना या फेरीत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – GEM ने व्यवहार शुल्कात मोठ्या कपातीची केली घोषणा)
यंदा जिल्ह्यात २३२ शाळांमध्ये २ हजार ३७६ जागांसाठी आरटीई (RTE) प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातून ६ हजार ६२६ बालकांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले. आतापर्यंत पहिल्या प्रमुख फेरीसह तीन फेऱ्यांमध्ये १ हजार ९७६ बालकांचे प्रवेशनिश्चित करण्यात आले आहे. तर १ हजार २१२ बालकांच्या पालकांनी मात्र शाळांमध्ये प्रवेशाकरिता संपर्कच केला नाही. याशिवाय ४२ प्रवेश रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे ४२० जागा अद्यापही रिक्त आहे. तिसरी फेरी १२ सप्टेंबरलाच संपुष्टात आली. परंतु, जागा रिक्त असल्याने शासनाकडून चौथी फेरी राबविली जात आहे.
(हेही वाचा – Dharavi Masjid Demolition : मुंबईतील परिस्थिती बिघडली, तर जिहादी कारणीभूत; आमदार नीतेश राणेंचा इशारा)
त्यामुळे आता प्रवेशाला पाठ दाखविणाऱ्या १ हजार २१२ बालकांकरिता या फेरीमध्ये संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता यातून किती पालक या फेरीला रिस्पॉन्स देतात, याकडे लक्ष लागले आहे. कारण यंदा ही प्रवेशप्रक्रिया आधीच उशीरा सुरू झाल्याने यातील सर्वच पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश आरटीईच्या (RTE) प्रतीक्षेत इतरस्त्र केलेले आहे. परंतु, चौथ्या फेरीत या पालकांना त्यांच्या मर्जीतील शाळा मिळाली तरच ते पालक या फेरीचा लाभ घेणार आहे. हे मात्र निश्चित अन्यथा ही शेवटची फेरी असल्याने यंदा शाळांमध्ये आरटीईचे प्रवेश रिक्त राहण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. या फेरीचे प्रवेश २७ सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community