नुकतेच १२ वीच्या परीक्षा झाल्या आहेत. आता उत्तरपत्रिका तपासणे आणि अन्य कामे सुरु असून विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. असे असतांना विरारमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. (12th Answer Sheets) १२ वी बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळून खाक झाल्या आहेत. विरारच्या (Virar) एका शिक्षिकेच्या घराला आग लागल्याने त्यात उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्या आहेत. ही घटना १० मार्च या दिवशी विरार पश्चिमेच्या बोळींज परिसरातील नानभाट रोडवरील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये घडली.
(हेही वाचा – ‘रोजा’ सोडण्यासाठी विधानभवनासमोरच्या पदपथाचा वापर; मंत्री Nitesh Rane यांच्या निर्देशानंतर कारवाईला वेग)
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या. सोमवारी घरात अचानक आग लागली आणि या आगीत संपूर्ण उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जळून खाक झाला. सदर घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
बारावीच्या उत्तरपत्रिका शाळेतच तपासणे बंधनकारक असताना त्या शिक्षिकेने उत्तरपत्रिका तपासायला घरी कशा नेल्या?, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शिक्षण मंडळाच्या नियमानुसार (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education), परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका सुरक्षित पद्धतीने शाळेतच तपासण्याचे निर्देश असतात. त्यामुळे या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या आणि त्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उत्तरपत्रिका जळल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास शीघ्रतेने करण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. (12th Answer Sheets)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community