12th Board Exam: राज्यात पहिल्याच दिवशी 42 केंद्रांवर कॉपी; सर्वाधिक कॉपीची प्रकरणे मराठवाड्यात

131

राज्यात बारावी बोर्डाच्या परीक्षा (12th Board Exams) सुरू झाल्या असून, मंगळवारी पहिला पेपर इंग्रजीचा होता. दरम्यान बारावीच्या (HSC) पहिल्याच पेपरच्या दिवशी 42 ठिकाणी कॉपी (12th Board Exams copy case) केल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक कॉपीचे प्रकार हे छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) उघडकीस आले असून 26 केंद्रांवर कॉपी प्रकरणाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागातून एकही गैरप्रकार समोर आलेला नाही. या विभागात कॉपीमुक्त अभियान पहिल्याच दिवशी 100 टक्के यशस्वी ठरल्याचे दिसून आले. (12th Board Exam)

(हेही वाचा – Bangladeshi infiltrators: इराकला पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना मुंबईत अटक)

राज्यात 12 वी परीक्षेसाठी 15 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 9 विभागात असलेल्या विविध केंद्रांवर उपस्थित राहून परीक्षा दिली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याचे आवाहन करत परीक्षा केंद्रावरील प्रमुखांकडून सक्त ताकीद देण्यात आली होती. त्यामुळे, कुठे दडपणात तर कुठे उत्साहात 12 वी परीक्षेचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर संपन्न झाला. मात्र, काही ठिकाणी कॉपीचा गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. राज्यात 42 ठिकाणी कॉपीचा गैरप्रकार घडला असून सर्वाधिक 26 ही संख्या छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. त्यामध्ये, जालन्यातली काही केंद्रावर सर्रासपणे कॉपीचा प्रकार घडत असल्याचे व्हिडिओ व फोटोही समोर आले आहेत. 

जालना जिल्ह्यात देखील कॉपीचे प्रकरणे उघडकीस आले आहेत. जिल्ह्यातील दोन केंद्रांवर कॉपी पुरवणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. एका केंद्रावर तर कंपाऊंडवर चढून कॉपी पुरवण्यात येत होत्या, तर दुसरीकडे शाळेच्या छतावर चढून कॉपी पुरवण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले. भरारी पथकाला लक्षात आल्यानंतर मंठा शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातल्या (Swami Vivekananda College, Mantha) एका विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाचे कौतुक; राज्याचे राजकारण योग्य…)

हिंगोली जिल्ह्यात पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला 622 विद्यार्थी गैरहजर होते. तर एका परिक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्यास कॉपी करतांना पकडले असून त्याच्यावर कॉपीकेस करण्यात आली आहे. विभागीय मंडळाने नियुक्त केलेल्या चार भरारी पथकाने जिल्हयातील परिक्षा केंद्रांना (Examination Centre) भेटी देऊन पाहणी केली. तर सेनगाव तालुक्यातील एका परिक्षा केंद्रावर एक विद्यार्थी कॉपी करतांना आढळून आल्याने त्याला सहा महिन्यासाठी रेस्टीकेट केल्याची माहिती मिळाली. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.