12th Result 2024: बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार, मार्कशीट किती दिवसांत मिळणार?

mahresult.nic.in या साईटला जाऊन विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहू शकतात.

267
12th Result 2024: बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार, मार्कशीट किती दिवसांत मिळणार?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाबाबत अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. बऱ्याच दिवसांपासून पालक आणि विद्यार्थी उत्सुकता आणि आतुरतेने ज्याची वाट पाहात असलेला बारावीचा निकाल मंगळवारी, (२१ मे) रोजी जाहीर होणार आहे. (12th Result 2024)

मंगळवारी, दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. निकालाची प्रतीक्षा पाहात होते. निकाल जाहीर होण्यापूर्वीच बोर्डाकडून काही वेबसाईटदेखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

(हेही वाचा – Narendra Modi: गांधी घराण्याच्या ४ पिढ्यांनी भारतीय संविधानाचा अपमान केला, पंतप्रधानांची जहाल शब्दांत टीका)

इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी, (२१ मे) जाहीर होणार असला, तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मार्कशीट हातात पडण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे; कारण निकाल लागल्यानंतर १० दिवसांत मार्कशीट मिळू शकते. याबाबत बोर्डाकडून मंगळवारी, (२१ मे) घोषणा होण्याची शक्यता आहे.

निकाल कसा पाहाल?
– mahresult.nic.in या साईटला जाऊन विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांकडे परीक्षेचा क्रमांक असणे आवश्यक आहे. Maharashtra SSC and HSC result येथे क्लिक करावे लागेल. त्यानंतर संकेतस्थळावर परीक्षा क्रमांक, जन्म तारीख सबमिट करावे लागेल. Maharashtra board 12th results 2024 चा तुमचा निकाल दिसेल.

– यंदा राज्यात २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ दरम्यान परीक्षा पार पडल्या. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आली आहे. यामध्ये पुणे, कोकण, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर याप्रमाणे mahahsscboard.in, hsc.mahresults.org.in, hscresult.mkcl.org, results.gov.in. या साईटवर जाऊनदेखील बारावीचा निकाल पाहू शकता.

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा
राज्यात बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षेची जोरदार तयारीदेखील करण्यात आली होती. आता दहावीच्या निकालाचे कामदेखील अंतिम टप्प्यात असल्याचे बोर्डाकडून सांगितले जातंय. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाची विद्यार्थी आतुरतेने वाट बघतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.