बोअरवेलमुळे गळती लागलेल्या ठाण्यातील त्या जलबोगदा दुरुस्तीवर १३ कोटींचा खर्च

264
बोअरवेलमुळे गळती लागलेल्या ठाण्यातील त्या जलबोगदा दुरुस्तीवर १३ कोटींचा खर्च
बोअरवेलमुळे गळती लागलेल्या ठाण्यातील त्या जलबोगदा दुरुस्तीवर १३ कोटींचा खर्च

सचिन धानजी, मुंबई

मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला (टनेल) ठाणे येथे झालेल्या गळती दुरुस्तीच्या कामावर तब्बल १३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. कुपनलिका भूमिगत जल बोगद्यावर जानेवारी महिन्यात कुपनलिका खोदताना लागलेल्या गळतीचे काम एप्रिल महिन्यात हाती घेण्यात आले होते. या जलबोगद्यावरील गळतीच्या दुरुस्तीसाठी ३० दिवसांचा अवधी गृहीत धरण्यात आला होता, परंतु अवघ्या १८ दिवसांमध्येच हे काम महापालिकेने पूर्ण केले होते.

भांडूप संकुल येथील जलशुध्दीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. या जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे (बोअरवेल) खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. ही गळती दुरुस्तीसाठी हा जलबोगदा ३१ मार्च २०२३ पासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे ३१ मार्च २०२३ पासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्‍तीचे काम पूर्ण होईपर्यंत सुमारे ३० दिवस कालावधीसाठी १५ टक्‍के कपात जाहीर करण्यात आली होती. हा जलबोगदा जमिनीपासून सुमारे १०० ते १२५ मीटर खोलवर आहे. हानी पोहचल्याचे ठिकाण भांडुप संकुल झडप (शाफ्ट) पासून सुमारे ४.२ किलोमीटर अंतरावर होते. सुमारे १२५ मीटर खोल व ४.२ किलोमीटर लांब आतमध्ये शिरुन जलबोगद्याची दुरुस्ती करणे, हे जल अभियंता विभाग आणि पाणीपुरवठा प्रकल्प विभागासमोर आव्हानच होते.

(हेही वाचा – मुंबई शहराच्या विकासासाठी ३६५ कोटींचा निधी; जिल्हा नियोजन समितीची मंजुरी)

त्यामुळे महापालिकेने या टनेलच्या दुरुस्तीच्या कामांसाठी महापालिकेने एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स पटेल इंजिनिअरींग, सोमा एंटरप्रायझेस लिमिटेड या कंपन्यांकडे विचारणा की होती. यातील पटेल इंजिनिअरींग आणि एसएमसी या कंपन्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे सोमा एंटरप्रायझेस लिमिटेड या कंपनीकडून खर्चाचा तपशील मागवून घेण्यात आला होता. या जलबोगद्याच्या कामासाठी सोमा एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आणि त्यांनी विविध करांसह १३ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. सोमा एंटरप्रायझेस या कंपनीच्या माध्यमातून हेगडेवार उद्यान अमर महल पासून प्रतीक्षा नगर वडाळा आणि पुढे सदाकांत ढवण उद्यान परेल पर्यंत जलबोगद्याच्या उभारणी काम करत आहेत. त्यामुळे जलबोगद्याच्या दुरुस्तीच्या कामांसाठी येणारा खर्च हा विद्यमान जलबोगद्यांच्या कंत्राट कामांमध्ये समाविष्ठ करून कंत्राटदाराला देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.