Thane Dahihandi : ठाणे शहरात १३ गोविंदा जखमी; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु

183
Thane Dahihandi : ठाणे शहरात १३ गोविंदा जखमी; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु
Thane Dahihandi : ठाणे शहरात १३ गोविंदा जखमी; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु

मुंबईसह ठाणे शहरात सकाळीपासूनच दहीहंडीचा थरार पाहायला मिळत आहे. ८-९ थरांची सलामी देत गोविंदा पाहणाऱ्यांना श्वास रोखायला लावणारे थरार करत आहेत. (Thane Dahihandi) अशातच ठाणे शहरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत १३ गोविंदा जखमी झाले आहेत. यामध्ये ९ गोंविदांना कळवा रुग्णालयात, तर ४ गोविंदांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. यामध्ये एका महिला गोंविदाचा समावेश असून त्या महिला गोविंदाच्या मणक्याला दुखापत झाल्याने, नातेवाईकांनी तातडीने मुंबईच्या खासगी रुग्णालयात हलविले आहे. तर एक गोविंदाचा हात फॅक्चर झाला असून उर्वरित सर्व जण किरकोळ जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या सर्वांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

(हेही वाचा – OBC Reservation : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा डाव हाणून पाडणार; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून महापंचायत होणार !)

यामध्ये कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलेल्यांमध्ये अनिकेत अनिल मेंढकर (रा.चिराग नगर, ठाणे.) अक्षय कडू (२५) मुलुंड पूर्व येथील नरेंद्र धामनराव वाल्मिक, दिव्यातील पीयूष पी. लाला (१८ ), सोमनाथ सुभाष सूर्यवंशी (२७), केदार पवार (२८) ,गौरव विष्णू चौधरी (२०) ,कल्याणचा चैतन्य हेमंत ढोबळे (२१) , दिघा येथील आकाश जयचंत चव्हाण (२०) या ९ जणांसह कांजूर मार्ग येथील अनिकेत खोडे (२१) , जोगेश्वरी येथील अर्चना खैरमार (३७) आणि गोरेगाव येथील राहुल केदारे (२९) तसेच विरार येथील पृथ्वी पांचाळ अशी १३ जखमी गोविंदांची नावे आहेत.

राजकीय नेत्यांकडून दहीहंडीचे आयोजन

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई, ठाण्यात राजकीय नेत्यांची रेलचेल दिसून आली. वर्तकनगर येथे प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानने दहीहंडीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध कलाकारांनी उपस्थित राहत गोविंदा पथकाचा उत्साह वाढवला. टेंबी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. या ठिकाणीही अनेक गोविंदा पथकांनी हजेरी लावली. अवधूत गुप्ते आणि इतर सेलिब्रिटींनी हजेरी लावत गोविंदांचा उत्साह वाढवला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. (Thane Dahihandi)

घाटकोपर येथे आमदार राम कदम, दादरमध्ये शिवसेना भवनजवळ युवासेनेकडून  निष्ठा दहीहंडीचे ही आयोजन करण्यात आले होते. तर, आमदार प्रकाश सुर्वे मागाठणे येथे दहीहंडीचे  आयोजन केले. या दहीहंडी उत्सवात विविध राजकीय नेत्यांसह मराठी, हिंदी चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली. डोंबिवलीतील क्षीतिज संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या गतिमंद विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला. (Thane Dahihandi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.