Hindu Temple : नाशिक क्षेत्रातील १३ प्रमुख हिंदू धार्मिक संघटनांचा ‘ओम प्रमाणपत्रा’ला पाठिंबा; संत-महंतांचेही आशीर्वाद

या प्रसाद शुद्धी चळवळीच्या अंतर्गत प्रसाद विक्रेत्यांना ओम प्रमाणपत्राचे वितरण करण्याची सुरुवात शुक्रवार, 14 जूनपासून नाशिकमधील श्री त्र्यंबकेश्वर मंदिरापासून होणार आहे.

299

मंदिरांमध्ये (Hindu Temple) भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. यामुळे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. या गैरप्रकाराच्या विरोधात व्यापक स्वरूपात प्रसाद शुद्धी चळवळ उभी करण्यात आली आहे. त्यासाठी आता प्रसाद विक्रेत्यांना ते वितरित करत असलेल्या प्रसादाच्या शुद्धतेचे प्रमाण देऊन ओम प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. तशी संकल्पना समस्त हिंदू संघटना आणि संत-महंतांच्या माध्यमातून अस्तित्वात आली आहे. या चळवळीची सुरुवात नाशिक येथून होणार आहे. विशेष म्हणजे चळवळीच्या शुभारंभाआधीच १३ प्रमुख हिंदू धार्मिक संघटनांनी या प्रमाणपत्राला पाठिंबा दिला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, अखिल भारतीय संत समिती धर्म समाजचे महाराष्ट्र प्रदेशचे महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज यांनी पुढाकार घेऊन ही चळवळ सुरू केली आहे. मागील तीन दिवसांपासून नाशिकमध्ये या चळवळीच्या दृष्टीकोनातून हिंदू संघटना आणि संत-महंत यांच्या बैठकांना जोर आला आहे. प्रसाद शुद्धी चळवळ ‘ओम प्रतिष्ठान’ च्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. या कार्याला नाशिक या कुंभनगरीतील पुरोहित संघ, आखाडा परिषद, पंचायती तपोनिधी आनंद आखाडा, दशनाम नागा संन्यासी. सनातन वैदिक धर्म सभा यांसह संत-महंतांचे शुभाशीर्वाद मिळत आहेत. (Hindu Temple)

(हेही वाचाHindu Temple : श्रद्धाजिहादविरुद्ध त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदूंची एकजूट; प्रसाद शुद्धीसाठी ओम प्रतिष्ठानची स्थापना)

त्र्यंबकेश्वर मंदिरापासून सुरुवात 

या प्रसाद शुद्धी चळवळीच्या अंतर्गत प्रसाद विक्रेत्यांना ओम प्रमाणपत्राचे वितरण करण्याची सुरुवात शुक्रवार, 14 जूनपासून नाशिकमधील श्री त्र्यंबकेश्वर मंदिरापासून (Hindu Temple) होणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले धार्मिक क्षेत्र आहे. येथे देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. मंदिराबाहेर प्रसादाची अनेक दुकानं असून या दुकानांमधील प्रसादात भेसळ किंवा कोणत्याही वर्ज्य पदार्थाचा वापर होत नाही ना याची पाहणी केली जाणर आहे. सर्व व्यवस्थित असलेल्या दुकानांना ‘ओम प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. ज्यायोगे भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचणार नाही.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.