कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष संपूर्ण देशभरात निर्बंध घालण्यात आले होते. याच काळात बेरोजगारीचे संकट उभे ठाकले. पालघर जिल्ह्याला सर्वाधिक बेरोजगारीची झळ बसली परिणामी येथील अनेक कुटुंबे जिल्हा सोडून रोजगाराच्या शोधात स्थलांतरित झाली. यामुळे दहावी व बारावी या शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर १३ हजार ८१३ विद्यार्थी गेली दोन वर्षे शाळेत गैरहजर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
( हेही वाचा : डेक्कन क्वीनमध्ये आता चॅटबाॅट सुविधा, असा करा मजेशीर प्रवास! )
पालघर जिल्ह्यात एकूण १ लाख १९ हजार १६१ विद्यार्थ्यांची हजेरीपटावर नोंद असून त्यापैकी १ लाख ५ हजार ३४८ विद्यार्थी वर्गात हजर राहतात आणि उर्वरित १३ हजार ८१३ विद्यार्थी गेली दोन वर्षे शाळेत गैरहजर आहेत. यामध्ये आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा समावेश असून जिल्ह्यातील शाळांमधील पटसंख्या सुद्धा घसरत चालली आहे.
या जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबे मासेमारी बोटींवर काम करण्यासाठी स्थलांतरीत झाल्यामुळे येथील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर होऊन १३ हजार ८१३ विद्यार्थी गेली दोन वर्षे शाळेत गैरहजर आहेत.
Join Our WhatsApp Community