Health Department : आरोग्य विभागात एकाच दिवशी १४ शासन निर्णय; रुग्णांच्या मृत्यूनंतर उपाययोजना

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाला जाग आली आहे.

96
नैराश्यावर मात करण्यासाठी Health Department ची टेलिमानस सेवा

नांदेड येथील रुग्णालयात काही तासांमध्ये अनेक रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभर सरकारवर टीकेची झोड उठली होती. (Health Department) नांदेड, नागपूर येथील आरोग्ययंत्रणांमधील त्रुटीही त्यामुळे समोर आल्या आहेत. रुग्णांच्या मृत्यूंमागे औषधांचा तुटवडा आणि अपुरा कर्मचारीवर्ग इत्यादी कारणे असल्याचे सांगितले जाते. आरोग्य विभागाच्या औषध खरेदीतील गोंधळ आणि अपुरा कर्मचारी वर्ग याविषयी विरोधक सातत्याने सरकारवर आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत. आरोग्य विभागाने २,८६२ अस्थायी पदांना मंजुरी दिली. परचर्या शाळा, प्लेग नियंत्रण पथके, जिल्हा परिषदांची प्राथमिक आरोग्य केंद्रे यांतील ही पदे आहेत. यामध्ये नाशिक मंडळातील २,१७३ अस्थायी पदांचा समावेश आहे. (Health Department)

(हेही वाचा – Raj Thackeray : उपोषण ही मनसेची पद्धत नाही)

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे, असे या निर्णयांविषयी बोलले जात आहे. आरोग्य विभागाने त्यासंदर्भातील १४ शासन निर्णय जारी केले आहेत.

राजकीय स्वार्थापोटी आरोप – देवेंद्र फडणवीस

संभाजीनगर, नागपूरसारख्या शहरांमध्ये रुग्णांच्या सरासरी मृत्यूंचा दाखला देत मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. काहींकडून राजकीय स्वार्थापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र निर्माण केले जाते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Health Department)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.