पश्चिम रेल्वे मार्गावर १४ तासांचा जम्बो ब्लॉक 

89

पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर शनिवार २८ मे रोजी रात्री ११ पासून ते रविवार २९ मे दुपारी १.३० वाजेपर्यंत १४ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पोईसर पुलाच्या कामासाठी बोरिवली ते कांदिवली दरम्यान दोन्ही जलद मार्गावर हा ब्लॉक असेल त्यामुळे बोरिवली ते गोरेगाव दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्या धीम्या मार्गावरून धावतील. जम्बो ब्लॉक कालावधीत विरारच्या दिशेने जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस अंधेरी ते बोरिवली दरम्यान पाचव्या मार्गिकेवरून धावतील.

१४ तासांचा जम्बो ब्लॉक 

  • स्थानक – बोरीवली ते कांदिवली
  • मार्ग – जलद
  • वेळ – शनिवार रात्री ११ ते रविवार दुपारी १.३०

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

हा मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.