मुंबईतील केवळ १५ दवाखान्यांमध्ये १४ तास मिळतात उपचार सेवा

सन २०२१-२२ च्या एकूण आरोग्य अंदाजपत्रकातील केवळ २० टक्के तरतूद मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी करण्यात आली आहे.

रुग्णांवर प्राथमिक उपचार केल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्यावतीने दवाखान्यांचा वापर पूर्ण क्षमतेने केला जात नसून मुंबईतील महापालिकेच्या एकूण १८७ दवाखान्यांपैकी केवळ१५ दवाखान्यांमध्येच १४ सेवा दिली जाते. तर उर्वरीत दवाखान्यांमध्ये केवळ ५ ते ८ तासांएवढेच उपचार केले जात असल्याची माहिती समोर आली. प्रजा फाऊंडेशनच्यावतीने जारी केलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रगस्तीपुस्तकातून ही बाब निदर्शनास आणून इतर दवाखान्यांमध्येही याचा अवलंब करण्याची गरज असल्याची सूचना केली आहे.

महापालिकेचे दवाखाने अधिक वेळासाठी चालू असावेत!

सन २०२१-२२ च्या एकूण आरोग्य अंदाजपत्रकातील केवळ २० टक्के तरतूद मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी करण्यात आली आहे. ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य सेवा देणारे महापालिकेचे दवाखाने, प्रसूतीगृहे आणि आरोग्य केंद्रे यांचा समावेश होतो. महापालिकेचे दवाखाने अधिक वेळासाठी चालू असावेत अशी मागणी प्रजा खूप काळापासून करत आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेने प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली असून सध्या १५ ठिकाणी १४ तास उपचार सेवा उपलब्ध आहे. हा बदल स्वागतार्ह असून अन्य दवाखान्यातही त्याचा अवलंब करण्याची गरज आहे. नॅशनल बिल्डींग कोडच्या निर्देशांप्रमाणे १५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना याप्रमाणे मुंबईत ८५८ सरकारी दवाखाने असणे गरजेचे आहे. परंतु शहरामध्ये केवळ १९९ सरकारी दवाखाने असल्याचे दिसून येत असल्याने प्रजाने चिंता व्यक्त केली आहे.

(हेही वाचाः यासाठीच ‘मी सर्व मंत्र्यांचे लाल दिवे काढून घेतले!’ गडकरींनी सांगितले कारण)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here