१४ लाख शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ

राज्यातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे १३.८५ लाख शेतकऱ्यांच्या १४.५७ लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे ५ हजार ७२२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

( हेही वाचा : रातोरात झाले बेरोजगार, पिंपरी-चिंचवडमध्ये शंभराहून अधिक कामगारांवर बेकारीची कु-हाड )

२०१९ मध्ये राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्याच्या वारसालाही हा लाभ मिळणार आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कोणाला मिळणार लाभ?

२०१७-१८ मध्ये घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१८ पर्यंत, २०१८-१९ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१९ पर्यंत, २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास; अथवा २०१७ ते २०२० या तिन्ही वित्तीय वर्षांत बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनूसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णत: परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी २०१८-१९ अथवा २०१९-२० या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here