बेंगळुरू ते दिल्ली विमान प्रवास करत असताना डॉक्टरांनी एका 14 महिन्यांच्या चिमुकलीवर तत्परतेने प्राथमिक उपचार करून तिला जीवदान दिले. या चिमुकलीला विमान प्रवासात 2 वेळा ह्रदयविकाराचा झटक आला. डॉक्टरांच्या दाखवलेल्या या कर्तव्यदक्षतेमुळे त्यांचे कौतुक होत आहे.
रविवारी बंगळुरुवरून दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या युके-814 या विमानातून बांगलादेशमधील एक 14 महिन्यांची लहान मुलगी आपल्या पालकांसोबत प्रवास करत होती. ती सियानोटिक आजाराने ग्रस्त होती. विमान प्रवासात तिची प्रकृती अचानक बिघडली.
(हेही वाचा – Bombay High Court : चक्क इमारतीनेच उच्च न्यायालयात दाखल केली याचिका; जाणून घ्या नेमका प्रकार काय?)
याच विमानातून दिल्ली येथील एम्स रुग्णालयाचे 5 डॉक्टर प्रवास करत होते. या लहान मुलीची प्रकृती बिघडल्याचे बघून या डॉक्टरांनी तत्परतेने या चिमुकलीवर प्राथमिक उपचार सुरू केले तसेच यावेळी हे विमान नागपूर विमानतळाच्या हद्दीत येताच इमर्जन्सी लँडिंगची विनंती केली. परवानगी मिळताच विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
उपचारादरम्यान मुलीला 2 वेळा ह्रदयविकाराचा झटका आला होता. पुढील उपचारासाठी तिला किंग्सवे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू असून ती व्हेंटिलेटरवर आहे, अशी माहिती रुग्णालयाचे प्रवक्ते ऐजाज शमी यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community