राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात

92

राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १२ पथके तैनात आहेत.

( हेही वाचा : देशातील सर्वांत भव्य राष्ट्रध्वज शिवाजी पार्कमध्ये उभारा : खासदार राहुल शेवाळेंची पुन्हा एकदा सरकारकडे मागणी )

नांदेड- १, गडचिरोली – १ अशी एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानाची सद्यस्थिती

राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३१६ गावे प्रभावित झाली आहेत. राज्यात विविध ठिकाणी ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११९ नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. तर २३२ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.