समृद्धी महामार्गावर १४ रानडुकरे ठार

नागपूर येथील हिंगाणा नजीकच्या समृद्धी महामार्गावर बुधवारी, ११ जानेवारी रोजी १४ रानडुकरांचा मृतदेह आढळला. भरधाव गाडीने एकाच कळपातील १४ रानडुकरांचा बळी घेतला. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानंतर प्रत्येक दिवसाला किमान दोन कोल्हे आणि एका रानमांजराचा बळी जात आहे. महामार्गावर प्राण्यांच्या संचारासाठी तयार केलेल्या भूयारी मार्गाची निवड चुकल्याची टीका पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते अश्विन अघोर यांनी केली.

महामार्गाच्या दुतर्फा जाळ्या लावल्या जाव्यात. दोन्ही बाजूला ४० फूट जागा लावल्या जाव्यात. जेणेकरुन वन्यप्राणी रस्ता ओलांडण्यासाठी जागा शोधताना भ्रमणमार्गाकडे वळतील.
– अश्विन अघोर, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते

१४ वन्यप्राण्यांच्या संचारासाठी भूयारमार्ग  

समृद्धी महामार्गातील बराचसा भाग जंगलातून वळवण्यात आला आहे. नाशिक-शिर्डी ते नागपूर या मार्गात जंगलातून जाणा-या मार्गात अनेकदा वन्यप्राण्यांचा मृतदेह आढळत आहे. नीलगाय, माकड, कोल्हे आदी प्राण्यांचे बळी जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते अश्विन अघोर यांनी स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी तीन कोल्हे मृतावस्थेत पाहिले. पहिल्या दिवसापासून आजतागायत दररोज वन्यप्राण्यांचा बळी जात असल्याने अघोर यांनी संताप व्यक्त केला. संपूर्ण महामार्गात अंदाजे १४ वन्यप्राण्यांच्या संचारासाठी भूयारमार्ग तयार करण्यात आला आहे. या जागांची निवड चुकीची झाल्यानेच वन्यप्राण्यांचा मोठ्या संख्येने महामार्गावर रस्ते ओलांडताना मृत्यू होत असल्याचा आरोप अघोर यांनी केला. वन्यप्राण्यांसाठी तयार केलेल्या भूयारीमार्गाच्या निर्मितीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन फुकट गेल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला.

(हेही वाचा शिवसेनेचा कारभार पक्षाच्या घटनेनुसारच चालतो का; ठाकरे गटाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here