केंद्राकडून महाराष्ट्राला १४९२ कोटींची मदत; CM Eknath Shinde यांची माहिती

124
कांदा साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करा; CM Eknath Shinde यांचे सक्त आदेश
  • प्रतिनिधी

पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या राज्यांच्या मदतीसाठी गृह मंत्रालयाने बुधवारी (२ ऑक्टोबर) जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला १ हजार ४९२ कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या १४ राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

(हेही वाचा – Sanjay Raut यांची नेटकऱ्यांनी का उतरवली?)

महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काही मागितले की ते लगेचच मिळते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ हजार ४९२ कोटींचे पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचा उल्लेख नेहमीच अन्नदाता असा करतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत हे दाखवून दिले आहे, असे शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.