खेड तालुक्याच्या पूर्व भागातील लोणकरवाडी येथे एकाच वेळ १५ मोरांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला की, विषबाधेने झाला यांचे कारण समजू शकले नाही. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघाताने या मोरांचा मूत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विषबाधा कारण असू शकते
तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी परिसरातील लोणकरवाडी येथे मोरांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. उन्हाचा वाढता तडाखा अथवा काहीतरी खाण्यात आल्याने झालेली विषबाधा हे कारण त्यामागे असू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. दावडी परिसरातील डोंगर परिसरात शेकडो मोर आहेत. १७ एप्रिल, रविवारी, सकाळी काही मोर तडफडत असल्याचे लक्षात आल्यानंतर दावडीचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, संतोष लोणकर व ग्रामस्थांनी धाव घेतली. काही मोरांचा आधीच मूत्यू झाला होता.
(हेही वाचा गणेश नाईक अडचणीत, नाईकांच्या वाड्यात चालला काय?)
Join Our WhatsApp Community