Vehicle : जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नवीन वाहनासाठी १५ टक्के कर सवलत; मंत्रिमंडळाचा निर्णय

100
Vehicle : जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नवीन वाहनासाठी १५ टक्के कर सवलत; मंत्रिमंडळाचा निर्णय
  • प्रतिनिधी

जुन्या वाहनांचे (Vehicle) प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नवीन वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना त्याच प्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना १५ टक्के कर सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

(हेही वाचा – Kamala Nehru Park ची देखभाल करणारे हात झाले कमी; अखेर कंत्राटदारावर जबाबदारी)

यापूर्वी, नोंदणीकृत वाहन (Vehicle) निष्कासन केंद्रावर (आरव्हीएसएफ) परिवहन प्रकारातील वाहने ८ वर्षांच्या आत आणि परिवहनेतर वाहने १५ वर्षांच्या आत मोडीत काढल्यास १० टक्के कर सवलत मिळत होती. आता नव्या निर्णयानुसार, एकरकमी कर लागू असणाऱ्या परिवहन आणि परिवहनेतर वाहनांना १५ टक्के सवलत मिळेल. तसेच, वार्षिक कर असणाऱ्या परिवहन वाहनांना नोंदणीपासून ८ वर्षांपर्यंत आणि परिवहनेतर वाहनांना १५ वर्षांपर्यंत वार्षिक करात १५ टक्के सूट मिळेल. वाहन मोडीत काढल्यानंतर मिळणारे ठेव प्रमाणपत्र (Certificate of Deposit) कर सवलतीसाठी दोन वर्षे वैध राहील. ही सवलत दुचाकी, तीनचाकी किंवा हलकी मोटार वाहने यापैकी ज्या प्रकारचे वाहन मोडीत काढले असेल, त्याच प्रकारच्या नवीन वाहनाच्या नोंदणीवर लागू होईल.

(हेही वाचा – रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; राष्ट्रपती Droupadi Murmu यांचे प्रतिपादन)

अधिसूचना जाहीर झाल्यापासून तीन वर्षांच्या आत वाहन (Vehicle) स्वेच्छेने मोडीत काढल्यास ही सवलत मिळणार आहे. या निर्णयामुळे पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल आणि नागरिकांना नवीन वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.