एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर विधानसभेत एमपीएससी मार्फत भरल्या जाणा-या रिक्त पदांचा मुद्दा गाजला. विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ही पदे भरण्याची मागणी केली. तेव्हा 31 जुलैपर्यंत ही पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
एमपीएससीच्या माध्यमातून अ, ब आणि क वर्गातील रिक्त असलेली १५ हजार ५११ पदे भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. लवकरच ही पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी विधान परिषदेत केली.
विरोधकांची मागणी
सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीचा मुद्दा पुढे करुन राज्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. स्वप्निल लोणकर त्यापूर्वीच पास झाला होता. त्यामुळे एमपीएससीबाबत धोरण ठोस असायला हवे, अशी मागणी गोपीनाथ पडळकर यांनी केली. जे विद्यार्थी पास झाले आहेत, त्यांच्या संदर्भात कार्यक्रम आखणार आहोत का?, असा सवाल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला. तसेच विविध विभागातील भरती प्रक्रियेत कोविड काळात काम करणाऱ्यांना प्राधान्य द्या, अशी मागणी त्यांनी केली. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही ज्यांच्या मुलाखती राहिल्या आहेत, त्या कधी होणार? पोलिस दलातील जे कर्मचारी खात्यांतर्गत पीएसआय परीक्षा पास झाले आहेत, त्यांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. त्या कधी मिळणार, असा सवाल त्यांनी केला.
(हेही वाचाः एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार! अजित पवारांची घोषणा)
इतकी पदे भरली जाणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले. नैराश्यातून आत्महत्या करत असून कोणाला दोषी ठरवू नये, अशा आशयाची चिठ्ठी स्वप्निल लोणकर याने आत्महत्येपूर्वी लिहिली होती. ही दुर्दैवी घटना आहे. कोणाच्याही मनात आत्महत्या करण्याची भावना येता कामा नये. तो २०१९ मध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याच्यासह १७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे मुलाखती झाल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अंतिम असतात, त्याचे पालन करावे लागते. मात्र आता राज्य सरकारने भूमिका घेतली आहे. लोकसेवा आयोगाचे निकाल जलद गतीने लावण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच रिक्त पदे भरण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. अ, ब आणि क श्रेणीतील एकूण ११ हजार ५११ पदे भरली जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही अजित पवार यांनी सांगितले.
या गटांमध्ये आहेत रिक्त पदे
गट अ- ४४१७
गट ब- ८०३१
गट क- ३०६३
एकूण जागा– १५ हजार ५११
(हेही वाचाः आरोग्याच्या खांद्यावर निवडणुकीचा भार!)
Join Our WhatsApp Community