१५ ते १८ वयोगटातील मुलांना ‘ही’ देणार लस!

118

येत्या 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ही लस सर्व प्राथामिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी दर सोमवार व शुक्रवार या दोन्ही वारी लसीकरण होणार आहे. या लसीकरणाचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील युवक-युवतींना कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे.

जिल्हाधिका-यांनी केले हे आवाहन

या लसीकरणापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी पालक, शाळा व महाविद्यालय व्यवस्थापकांनी जबाबदारी घ्यावी. ओमायक्रॉन या संसर्गाबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. घराच्या बाहेर पडताना प्रत्येक नागरिकांने मास्कचा वापर, सामाजिक अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे. ज्या खासगी आस्थापना शासनाने व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत आहेत अशा आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. भविष्यात कारवाईला गती देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत लसीचा एकही डोस घेतला नाही अशांनी प्राधान्याने पहिला डोस घ्यावा. तसेच ज्यांनी पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेतला नाही अशांनीही दुसरा डोस घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

(हेही वाचा आता आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.