नव्या शैक्षणिक वर्षात पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण स्कूल बसच्या शुल्कात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशनने घेतला आहे. नवे दर १ एप्रिल २०२३ पासून लागू केले जाणार आहेत.
( हेही वाचा : विरारमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू!)
१ एप्रिल २०२३ पासून लागू
राज्यभरात स्कूल बसच्या शुल्कामध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. सरकारने जुन्या गाड्या भंगारात काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्कूल बसच्या भाड्यांमध्ये वाढ होणार आहे. आम्ही आधीच मोठ्या खर्चाचा सामना करत आहोत त्यात पुढील महिन्यापासून नवीन प्रदूषण नियमांनुसार आमची वाहने अपग्रेड करणे यामुळे आम्हाला प्रति बस सुमारे १.५ ते २ लाख खर्च आला आहे असे स्कूल बस असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
स्क्रॅब मॉडेलच्या धोरणामुळे स्कूल बसच्या शुल्कात वाढ
सरकारच्या स्क्रॅब मॉडेलच्या धोरणामुळे स्कूल बसच्या शुल्कात १५ ते २० टक्के वाढ होणार आहे. तसेच बस चालकांचा पगार सुद्धा २५०० ते ३ हजारांनी वाढवायचा असून पार्किंगचा दंड सुद्धा स्कूल बसला भराव लागतो या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे याचा आर्थिक बोजा निश्चितच पालकांवर पडणार आहे.
Join Our WhatsApp Community