मुंबई-पुणे प्रवास होणार सुसाट! एसटीच्या ताफ्यात दाखल होणार १५० विद्युत बस

151

इंधनावर होणारा वाढीव खर्च कमी करण्यासाठी तसेच वाढत्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी एसटी महामंडळाने विद्युत बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये १५० बस खरेदी करण्यात येणार आहेत. या बसेसपैकी ५० बस मुंबई-पुणे महामार्गावर धावणार आहेत. मुंबई-पुणे महामार्गासह इतर मार्गांवर विद्युत चार्जिंगची सोय केली जाणार आहे. २०२४ मध्ये एसटीच्या ताफ्यात ५ हजार विद्युत बस विकत घेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

( हेही वाचा : Maharashtra Budget 2023: कफ सिरफ तयार करणाऱ्या २७ कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात; संजय राठोडांची माहिती )

एसटी महामंडळाचा आर्थिक तोटा, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना प्रदूषणमुक्त प्रवास करता यावा यासाठी विजेवर धावणाऱ्या गाड्यांचा समावेश प्रवासी वाहतुकीत करण्यात येणार आहे.

मुंबई – पुणे प्रवासासाठी इलेक्ट्रिक बस

मुंबई – पुणे प्रवासासाठी सुद्धा या इलेक्ट्रिक बसचा वापर केला जाणार आहे. मुंबई, ठाण्यातून पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेटसाठी येत्या ऑक्टोबरपासून टप्प्याटप्याने शिवाई बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. दादर – पुणे रेल्वे स्थानक व्हाया चिंचवड, परेल – स्वारगेट, ठाणे – स्वारगेट, बोरिवली – स्वारगेट असे मार्ग निश्चित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.