१५० प्रयोग, ९ वेळा स्पेसवॉक…; Sunita Williams यांनी अंतराळात ९ महिने काय काय केले ?

99

नासाच्या (NASA) अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अखेर ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) भारतीय वेळेनुसार १९ मार्चच्या पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या (Florida) किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले.

(हेही वाचा – शिवसेनेची Aaditya Thackeray यांच्यावर X वरून जहरी टीका; हिंदुत्व, औरंगजेब आणि नेतृत्वावरून घणाघात)

निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे देखील त्यांच्यासोबत होते. हे चौघेही अमेरिकेतील फ्लोरिडाजवळील समुद्रात उतरले. तिथून नासा आणि स्पेसएक्स टीमने त्यांना बाहेर काढले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (International Space Station) सुमारे ९ महिने राहिले, त्या काळात त्यांनी तिथे काय केले, याबाबत नासाने माहिती दिली आहे.

सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात ९ महिने कोणते संशोधन केले ?

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) देखभाल आणि स्वच्छतेमध्ये आपली भूमिका बजावली. या स्टेशनला सतत देखभालीची आवश्यकता असते. असे म्हटले जाते की, या स्टेशनचे क्षेत्रफळ जवळजवळ फूटबॉल मैदानाइतके आहे. सुनीता विल्यम्स यांनी जुन्या उपकरणांमध्येही बदल केले आणि काही प्रयोग केले. सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल ६२ तास ९ मिनिटे घालवली अर्थात ९ वेळा स्पेसवॉक केले. सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने ९०० तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी १५० हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ५ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. दोघांचाही हा प्रवास केवळ ८ दिवसांचा होता; परंतु अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना ९ महिने तिथे थांबावे लागले. या मोहिमेदरम्यान, सुनीता विल्यम्स वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त राहिल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.