- ऋजुता लुकतुके
थकलेल्या पगारामुळे गो फर्स्ट एअरलाइन्सच्या दीडशे लोकांनी मागच्या दोन आठवड्यांत नोकऱ्या सोडल्या आहेत. यात पायलट्सचाही समावेश आहे. त्यामुळे कंपनीने १८ ऑगस्टपर्यंतची सगळी उड्डाणं रद्द केली आहेत. गो फर्स्ट ही कमी तिकीट दर असलेली विमानसेवा आपलं रुतलेलं गाडं पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असतानाच कंपनीला आणखी एक धक्का बसला आहे. दोन आठवड्यांमध्ये आणखी दीडशे कर्मचारी कंपनी सोडून जात आहेत. कारण, थकलेला पगार.
या कर्मचाऱ्यांना मे पासून तीन महिने त्यांचे पगार मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या ठिकाणी नोकऱ्या बघायला सुरुवात केली आहे. मनीकंट्रोल या वेबसाईटने याविषयीची बातमी दिली आहे. आताच्या दीडशे कर्मचाऱ्यांपैकी ३० पायलट आणि ५० केबिन क्रूचे लोक आहेत. कोविड नंतरच्या पहिल्याच वर्षी २०२१-२२ या आर्थिक वर्षात कंपनीला खूप मोठा तोटा झाला. आणि तेव्हापासून गो फर्स्ट एअरलाईन रोखतेच्या मुख्य समस्येशी झगडते आहे.
कंपनीवर दिवाळखोरीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पण, या प्रक्रियेमुळे कंपनीने लीजवर विमानं घेतलेल्या कंपन्यांना आपले पैसे वळते करून घेता येत नाहीएत. कायदेशीर अडथळ्यांमुळे लीज देणाऱ्या कंपन्यांचे हात अडकलेत. आणि त्यांनी दिवाळखोरी प्रक्रियेविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. दुसरीकडे गो फर्स्ट कंपनीने दिलेली दिवाळखोरीची नोटीस ही स्वतःहून दिली आहे. २ मे पासून कंपनीच्या विमानांनी उड्डाण बंद केलं आहे. आणि आधीची मुदत संपल्यानंतर आता कंपनीने १८ ऑगस्टपर्यंतची उर्वरित उड्डाणंही रद्द केली आहेत. १६ ऑगस्टला कंपनीने एका ट्विटमध्ये परिस्थिती समजावून सांगितली.
(हेही वाचा – Shravan : पुरुषोत्तम मास समाप्ती, निज श्रावण मासाला सुरुवात, सोप्या पद्धतीने करा शिवआराधना)
Due to operational reasons, Go First flights until 18th August 2023 are cancelled. We apologise for the inconvenience caused and request customers to visit https://t.co/FdMt1cRjeD for more information. For any queries or concerns, please feel free to contact us. pic.twitter.com/2N15VBzOKO
— GO FIRST (@GoFirstairways) August 16, 2023
स्वत:हून दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर गो फर्स्ट कंपनीने कमबॅक किंवा पुनरागमनाचे प्रयत्न सोडलेले नाहीत. एकीकडे विमानसेवा सुरू ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. आणि १५ ऑगस्टनंतर काही विमानफेऱ्या पुन्हा सुरू करण्याचाही कंपनीचा प्रयत्न होता. पण, त्यांना आता पुन्हा एकदा खिळ बसली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community