मुंबईतील १५० वर्षे आयुर्मान पूर्ण झालेला ब्रिटीश काळातील कर्नाक पूल पाडण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांना ना हरकत प्रमाणपत्र रेल्वे आणि महापालिका प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे २० ऑगस्ट ते २० नोव्हेंबर या काळात हा पूल पाडून या पूलाची पुनर्बांधणी १९ महिन्यांमध्ये करण्यात यावी अशा सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.
( हेही वाचा : मुंबई-पुण्यातील वॉर्ड पुनर्रचना ‘जैसे थे ठेवा’,सर्वोच्च न्यायालयाची शिंदे सरकारच्या निर्णयाला स्थगिती)
कर्नाक बंदर पूल २०२४ पर्यंत बंद राहणार आहे. हा पूल बंद झाल्यावर सीएसएमटी, फोर्ट दिशेला जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. संभाव्य वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
वाहतूक नियोजनासाठी ७० वाहतूक मदतनीस, १०० चमकणारे दिवे, ५० रिफ्लेक्टर जॅकेट, ५० बटन आणि ५० दिशादर्शक फलक उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहे. तसेच आप्तकालीन परिस्थिती उद्भवल्यास बंद पडलेली वाहने हटवण्यासाठी एक हेवी क्रेन २४ तास उपलब्ध असेल. वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलिसांनी मागणी केलेले साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी सूचना मध्य रेल्वेने महापालिकेला केली आहे.
कर्नाक बंदर पूल
- पुलाचे निर्मिती वर्ष – १८६६-६७
- जड वाहतुकीसाठी पूलाचा वापर बंद – ऑगस्ट २०१४
- पूल पाडणे – २० ऑगस्ट ते २० नोव्हेंबर
- पूलाची पुनर्बांधणी – २० नोव्हेंबर २०२२ ते २० जून २०२४