मागील अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याचे आवाहन करत कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असली तरी याला आजवर न मिळालेला प्रतिसाद कोविड काळात चांगलाच लाभलेला पहायला मिळाला. परंतु यंदा कोविड निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यात येत असल्याने गणेश भक्तांमध्ये वेगळेच वातावरण पहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांपासून वाढवलेल्या कृत्रिम तलावांची संख्या यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, ही संख्या वाढवण्यात आली असली तरी यंदा निर्बंधमुक्त वातावरणामुळे भक्तांचा कृत्रिम तलावांमधील गणेश मूर्ती विसर्जनाचा कल दिसून येत नाही. दरम्यान, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात केवळच ३ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून या मतदार संघात पर्यावरणप्रेमी असलेल्या आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतलेला पहायला मिळालेला नाही.
मुंबई महापालिकेने मागील वर्षी गणेशोत्सवामध्ये १७३ कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आली होती, परंतु यंदाच्या गणेशोत्सवात १५२ कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहे. मागील दोन्ही वर्षी कोरोनामुळे कृत्रिम तलावांची संख्या वाढवतानाच ट्रकवरील फिरत्या कृत्रिम तलावांच्या संख्येतही वाढ करण्यात आली होती. परंतु या फिरत्या कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार नाही. पर्यावरणपूरक गणेश विसर्जन स्थळांसाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येत असली तरी भाविकांनी समुद्रांमध्ये तसेच नैसर्गिक तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जन न करता कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करावे आणि समुद्र आणि तलाव जलप्रदुषित होण्यापासून वाचवून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
(हेही वाचा फुटीच्या भीतीने उपनेते पदाची माळ शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात)
कृत्रिम तलावांची यादी विभागनिहाय
ए विभाग
कुलाबा कुपरेज महापालिका उद्यान
बी विभाग
- वीर संभाजी मैदान, नवरोजी हिल रोड क्रमांक ५
- जनाबाई रोकडे शाळा, माधवराव रोकडे मार्ग
सी विभाग
- दुर्गा देवी उद्यान, सहावा कुंभारवाडा
- स. का. पाटील उद्यान.
डी विभाग
- ताडदेव पोलिस वसाहत
- तुळशीवाडी आरटीओ
- बीआयटी चाळ
- ऑगष्ट क्रांती मैदान,
- सुर्यवंशी मैदान
- बाणगंगा लेक
ई विभाग
- चिंचपोकळी आर्थररोड नाका पानसरे चाळ
- राणीबाग
- बाटलीबॉय मैदान
- डॉकयार्ड रोड स्टेशन, गंगा बावडी पोलिस वसाहत
- ताडवाडी बीआयटी मैदान
- माँटे साऊथ बी.जे. मैदान
- आग्रीपाडा महापालिका शाळा
- कामाठीपुरा १२ वी गल्ली
एफ उत्तर
- प्रतीक्षा नगर अशोक पिसाळ मैदान
- वडाळा महर्षी कर्वे उद्यान
- विद्यालंकार कॉलेज मार्ग,अँटॉप हिल
- शिवप्रेरणा गृहनिर्माण संस्था,भरणी नाका मार्ग, अँटॉपहिल
- रमेश दडकर मैदान, माटुंगा
एफ दक्षिण
- दादर पूर्व शिंदे वाडी भवानी माता क्रिडांगण
- भोईवाडा सदाकांत ढवण मैदान
- शिवडी प्रबोधनकार मैदान
- परळ कामगार मैदान
- परळगाव लालओटा क्रीडांगण
- टी.जे.रोड विनायक वाबळे मैदान
- लालबाग बेस्ट मैदान
- काळाचौकी भगतसिंह मैदान
- बालविकास मनोरंजन मैदान
- चिंचपोकळी सदगुरु भालचंद्र मैदान
- जी.डी.आंबेकर मैदान देवजी परब मैदान
- मनोरंजन मैदान
- जी उत्तर मैदान
- शिवाजी पार्क महापालिका क्रीडाभवन
- दादर बोले मार्ग चौधरी वाडी,
- दादर आगाशे पथ केशवराव दाते उद्यान
- बाळगोविददास मार्ग ओम समर्थ व्यायाम मंदिर
- माहिम मृदुंगाचार्य मैदान
- माहिम छत्रपती शिवाजी महाराज मार्ग मोकळे मैदान
- धारावी शिवराज मैदान
- शाहुनगर मैदान
- धारावी पंपिंग स्टेशन
- धारावी संत रोहिदास मैदान पर्ल रेसिडेन्सी
(हेही वाचा ट्वीन टॉवर प्रमाणेच चांदणी चौकातील पूलही पडणार)
जी दक्षिण
- मुरारी घाग चवन्नी गल्ली मैदान
- महाराष्ट्र हायस्कूल
- जांभोरी मैदान
एच पूर्व
- सांताक्रुझ पूर्व कलिना कलिना टँक
- वांद्रे पूर्व चेतना कॉलेज जवळ
- खेरवाडी जंक्शन
- सांताक्रुझ पूर्व गोळीबार ६ वा रस्ता महापालिका शाळा
एच पश्चिम
खार पश्चिम मुक्तानंद पार्क
के पूर्व विभाग
- मरोळ अंधेरी हसनत शाळेजवळ
- अंधेरी कोंडीविटा रोड स्टेलिंग कोर्टजवळ
- शेरे पंजाब जिजामाता रोड
- अंधेरी पूर्व रमेश मोरे पार्क
- शहाजी राजे शाळेजवळ विलेपार्ले पूर्व
- विलेपार्ले पूर्व हेगडेवार मैदान
- जोगेश्वरी पूर्व गगनगिरी महाराज मैदान
के पश्चिम
- अंधेरी पश्चिम लोखंडवाला बँक रोड
- अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्स
- सहकार रोड रावजी ग्राऊंड
- संत रामदास गार्डन
- लल्लूभाई पार्क सरदार वल्लभभाई पटेल गार्डन
- धनजी मेहता ग्राऊंड
- पवई धनजीभाई मेहता ग्राऊंड
एल विभाग
- पवई बामनदायी खेळाचे मैदान
- चांदिवली विजय फायर मार्ग
- असल्फा मिलिंद नगर, छत्रपती शिवाजी महाराज खेळाचे मैदान
- कुर्ला पूर्व न्यू मिल रोड राजे शिव छत्रपती खेळाचे मैदान
एम पूर्व विभाग
गोवंडी पश्चिम देवनार कॉलनी
एम पश्चिम विभाग
- शेल कॉलनी जेतवन उद्यान
- टिळक नगर लाल मैदान
- चेंबूर गांधी मैदान
(हेही वाचा भाजपाचा मनसेला टाळी देण्याचा प्रयत्न, सलग तीन नेत्यांनी राज ठाकरेंची घेतली भेट)
एन विभाग
- घाटकोपर पश्चिम भटवाडी दत्ताजी साळवी मैदान
- साईनाथ नगर बाबू गेनू मैदान
- घाटकोपर पूर्व पंत नगर आचाय अत्रे नगर
- अंधेरी घाटकोपर लिंक रोड साई निवास
- विक्रोळी पार्कसाईट छत्रपती शिवाजी महाराज मैदान
- विक्रोळी पश्चिम मार्केट प्लॉट
पी उत्तर विभाग
- मालाड पूर्व बुवा साळवी मैदान
- राम लीला मैदान
- मालाड पश्चिम म.वा.देसाई
- सर जी.पा.जी.मैदान
- मालाड मालवणी आरएसी १४
- माँसाहेब मिनाताई ठाकरे मैदान
- पुष्पापार्क टोपीवाला स्कूल
- मालाड पश्चिम छत्रपती शिवाजी राजे कॉम्पलेक्स
- मालाड पूर्व क्रांतीनगर एसआरए ग्राऊंड
- मालाड पश्चिम एमएचबी कॉलनी शाळा क्रमांक १, गट क्रमांक ७
पी दक्षिण विभाग
- गोरेगाव पूर्व आरे भास्कर मैदान
- बिबींसार मैदान
- लक्ष्मण नगर खेळाचे मैदान
- सोनावाला क्रॉस रोड
- उन्नत नगर महापालिका शाळेचे मैदान
- अण्णाभाऊ साठे मैदान
- फिरती विसर्जन स्थळे राम मंदिर एमएमआरडीएचा परिसर
आर मध्य विभाग
- बोरीवली पश्चिम गोराई छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण
- बोरीवली पश्चिम योगी नगर, नागतोडी मैदान
- अभिनव नगर, नागरी प्रशिक्षण केंद्र
- अनंतराव भोसले उद्यान
- सुस्वागत हॉटेल जवळ
- बोरीवली पूर्व कुलूपवाडी रवीशंकर शाळेजवळ
- नॅशनल पार्क
- राजदा महापालिका शाळेजवळील भूखंड
- एलटी रोड जनरल अरूणकुमार वैद्य मैदान
- सत्य नगर पावनधाम मागील भूखंड
- चारकोप सेक्टर ४मधील महापालिका शाळेचे मैदान
आर उत्तर विभाग
- दहिसर पश्चिम वायएमसीए उद्यानाजवळ महापालिका मैदान
- दहिसर डिएसएफ मैदान
- दहिसर पूर्व सुहासिनी पावसकर रोड महापालिका मैदान
- दहिसर संत चौखामेळा पांडुरंगशास्त्री आठवले मैदान
- दहिसर पूर्व अशोकवन महापालिका मैदान
- दहिसर पश्चिम तावडे वाडी
- दहिसर पश्चिम कल्पना चावला रोड नारायण स्कूल शेजारी महापालिका मैदान
आर दक्षिण विभाग
- चारकोप सेक्टर १मधील छत्रपती शिवाजी मैदान
- कांदिवली पश्चिम एकता नगर गोसालिया रोड जवळ
- कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्पलेक्स रायन शाळेजवळ
- कांदिवली पूर्व आकुर्ली परिरक्षण चौकी
- कांदिवली पूर्व प्रतिभा देवी उद्यान
- आकुर्ली रोड लोखंडवाला महाराणा प्रताप उद्यान
एस विभाग
- भांडुप पश्चिम श्रीरामपाडा श्रीरामपाडा मैदान
- तुळशेतपाडा कैलासपार्क
- भांडुप स्टेशन समोर सॉल्ट ऑफीस रोड
- टँक रोड प्रमोद महाजन मैदान
- गावदेवी रोड देवीपाडा
- कोकण नगर क्वॉरी रोडश, क्रीटी केअर हॉस्पिटल
- गाढव नाका, लालशेठ कंपाऊंड
- महाराष्ट्र नगर, स्कायलाईन इमारत
- कांजूर पूर्व, कांजूर पोलिस स्टेशन परिवार गार्डन
- विक्रोळी पूर्व बालगंधर्व मैदान कन्नमवार नगर
- टागोर नगर विद्यामंदिर स्कूल
- टागोर नगर,सुरवडे मार्ग डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग
- विक्रोळी पश्चिम हरियाली व्हिलेज एलबीएस रोड
- पवई साकीविहार रोड, मोरारजी नगर, कैलास नगर
- पवई तिरंदाज शाळेजवळ
टी विभाग
- मुलुंड पश्चिम स्वप्न नगरी रोड
- वीर सावरकर मार्ग
- जकात नाका,एलबीएस
- कालिदास नाट्यगृह