उत्कृष्ट तपासाबद्दल ‘या’ पोलिस अधिकाऱ्यांचा  केंद्राकडून होणार गौरव!

देशातील एकूण १५२ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये २८ महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

123

महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा केंद्र सरकारकडून गौरव करण्यात येणार आहे. त्यांना वर्ष २०२१साठी ‘उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक’ देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्रातील ११ अधिकाऱ्यांचा समावेश 

केंद्र सरकारने महाराष्ट्र पोलिसांतील ११ पोलिस अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर केला आहे. त्यासाठी राज्यातील ११ पोलिस अधिकाऱ्यांना वर्ष २०२१ साठी पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. त्यांना ‘उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक’ प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने सर्व पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र पोलिसांनी अभिनंदन केले आहे. यामध्ये सुनील देविदास कडासने, पोलिस अधिक्षक, बाबुराव भाऊसो महामुनी, पोलिस उप अधिक्षक, अजित राजाराम टिके, पोलिस उप अधिक्षक, उमेश शंकर माने-पाटील, पोलिस उप-अधिक्षक, पदमजा अमोल बडे, सहाय्यक पोलिस आयुक्त, प्रीती प्रकाश टिपरे, सहाय्यक पोलिस आयुक्त, ममता लॉरेन्स डिसुझा, पोलिस निरीक्षक, मनोहर नारसप्पा पाटील, पोलिस निरीक्षक, सुनील शंकर शिंदे, पोलिस निरीक्षक, अल्का धीरज शिंदे, पोलिस उप निरीक्षक, राहुल ढालसिंग बाहुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशा ११ पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

(हेही वाचा : तुमचं शहर बुडणार आहे… नासाने दिला धोक्याचा इशारा)

देशातील १५२ अधिकाऱ्यांचा होणार सन्मान 

१५ ऑगस्ट रोजी या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. देशातील एकूण १५२ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये २८ महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पुरस्काराची सुरुवात २०१८ सालापासून सुरु झाली. त्यामध्ये १५ सीबीआयचे अधिकारी, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील अनुक्रमे ११-११, उत्तर प्रदेशातील १०, केरळ आणि राजस्थान येथे अनुक्रमे ९-९, तामिळनाडू येथील ८, बिहारचे ७, गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली येथे अनुक्रमे ६, तेलंगानाचे ५, आसाम, हरियाणा, ओडिशा आणि पश्चिम बंगालचे अनुक्रमे ४ पोलिस अधिकाऱ्यांचा सामावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.