विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील १५७ विद्यापीठांना डिफॉल्टर घोषित केले आहे. यामध्ये १०८ सरकारी, ४७ खासगी आणि २ अभिमत विद्यापीठांचा समावेश आहे. ज्या विद्यापीठांनी लोकपाल नियुक्ती केली नाही अशा विद्यापीठांवर यूजीसीने कारवाईचा बडगा उगारला असून यात महाराष्ट्रातील ७ विद्यापीठांचाही समावेश आहे. (UGC)
मध्यप्रदेशात यूजीसीने माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संप्रेषण विद्यापीठ (भोपाळ), राजीव गांधी तंत्रज्ञान विद्यापीठ (भोपाळ), जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ (जबलपूर), मध्य प्रदेश वैद्यकीय विज्ञान विद्यापीठ (जबलपूर), नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ (जबलपूर), राजा मानसिंग तोमर संगीत आणि कला विद्यापीठ (ग्वाल्हेर) आणि राजमाता विजयराजे सिंधिया कृषी विद्यापीठ (ग्वाल्हेर) यांचा समावेश डिफॉल्टर विद्यापीठांचा यादीत केला आहे. (UGC)
(हेही वाचा – Amit Thackeray: उद्धव ठाकरेंच्या ‘बिनशर्ट पाठिंबा’ च्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्त्युत्तर!)
‘या’ विद्यापीठांना केले डिफॉल्टर घोषित
यासोबतच आंध्र प्रदेशमधून ४, बिहारमधून ३, छत्तीसगडमधून ५, दिल्लीतून १, गुजरातमधून ४, हरियाणामधून २, जम्मू-काश्मीरमधून १, झारखंडमधून ४, कर्नाटकातून १३, कर्नाटकातून १, केरळमधून ७, मेघालयातून २, ओडिशातून २, राजस्थानमधून ७, सिक्कीममधून १, तेलंगणामधून ३, उत्तर प्रदेशातून १०, उत्तराखंडमधून ४ आणि पश्चिम बंगालमधून १४ विद्यापीठांना डिफॉल्टर घोषित केली आहेत. (UGC)
यासोबतच आंध्र प्रदेशात २, बिहारमध्ये २, गोव्यात १, गुजरातमध्ये ६, हरियाणामध्ये १, हिमाचल प्रदेशात १, झारखंडमध्ये १, कर्नाटकात ३, मध्य प्रदेशात ८, महाराष्ट्रातील २, राजस्थानची ७, सिक्कीमची २, तामिळनाडू १, त्रिपुरा ३, उत्तरप्रदेश ४, उत्तराखंडची २ आणि दिल्लीची २ खासगी विद्यापीठे डिफॉल्टर घोषित करण्यात आली आहेत. (UGC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community