MMRDA ची १५८ वी बैठक संपन्न; ‘या’ मुद्द्यांवर केली चर्चा

136
MMRDA ची १५८ वी बैठक संपन्न; 'या' मुद्द्यांवर केली चर्चा
प्रतिनिधी

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना मुंबई आणि नवी मुंबईशी थेट जोडण्यासाठी सल्लागाराने तयार केलेल्या बदलापूर ते विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉर या प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रकल्पाच्या प्राथमिक आखणी अहवालाला मंगळवारी (२४ सप्टेंबर) झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) बैठकीत मान्यता देण्यात आली. या मल्टीमोडल कॉरीडॉर प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (MMRDA) १५८ वी बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास वाढविण्याच्या प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख कोटींची विकास कामे सुरू असून ती कालमर्यादेत पूर्ण करावीत, अशा सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.

(हेही वाचा – Hawkers : जावळे मार्ग फेरीवाल्यांचा झाला नक्की कधी?)

या बैठकीत बॅकबे रिक्लेमेशन योजनेचा सुधारित विकास आराखडा सादर करण्यात आला. त्यामध्ये समुद्रकिनारे आणि खारफुटीसारख्या नैसर्गिक वैशिष्ट्यांवर विशेष लक्ष देऊन या क्षेत्राचे निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. याभागात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी ‘मरिना’ पर्यटन प्रकल्पाचा समावेश असून त्यामध्ये लहान बोटी आणि नौकांसाठी खास बंदर असणार आहे. हा सुधारित प्रारूप आराखडा मंजूर करून नागरिकांच्या सूचना मागविण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. (MMRDA)

भारतीय राष्ट्रीय भुगतान निगमच्या (एनपीसीआय) कार्यालयाला वांद्रे कुर्ला संकुलातील जी ब्लॉकमधील भूखंड देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. नीति आयोग आणि राज्य सरकार यांनी संयुक्तरित्या मुंबई महानगर प्रदेशासाठी तयार केलेल्या आर्थिक बृहत आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची प्रकल्प अंमलबजावणी प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी एमएमआरडीएचे (MMRDA) आयुक्त संजय मुखर्जी यांनी सादरीकरण केले. या बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आदी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.