औरंगाबादमध्ये फटाके फोडताना दुर्घटना, 16 मुलांच्या डोळ्यांना दुखापत

156

दिवाळीच्या सणाला गालबोट लावणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. औरंगाबाद येथे फटाके फोडताना झालेल्या दुर्घटनेतील जखमींचा आकडा आता वाढला असल्याची माहिती मिळत आहे.या दुर्घटनेत आतापर्यंत 16 मुलांच्या डोळ्याला आणि चेह-याला इजा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

16 मुलांना दुखापत

फटाके फोडताना या मुलांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या सर्व 16 मुलांना जिल्ह्यातील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर तिथे उपचार करण्यात येत होते. दरम्यान या सर्व मुलांवर उपचार करुन त्यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मुलांच्या डोळ्यांना,हातांना आणि चेह-याला इजा झाल्याची माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामध्ये एका 10 वर्षाच्या मुलाला गंभीर इजा झाली होती. त्याच्यावर उपचार करुन मंगळवारी सकाळी त्याला घरी पाठवण्यात आले आहे.

काळजी घेण्याचे आवाहन

तसेच चिखटणा परिसरात देखील एका चार वर्षांच्या मुलीला फटाके फोडताना इजा झाली होती. तिच्यावर देखील परिसरातील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान इतर मुलांना किरकोळ इजा झाल्या असून त्यांना देखील उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे फटाके फोडताना पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.